महाराष्ट्र

Amit Shah : अमित शहांनी फुंकले निवडणुकांचे रणशिंग; म्हणाले, 'धोका देणाऱ्यांना...'

प्रतिनिधी

काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी कोल्हापूर दौरा केला. यावेळी त्यांनी निवडणुकांचे रणशिंग फुंकले. ते म्हणाले की, "लोकसभा आणि विधानसभेची २०२४ची निवडणूक भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार आहेत. उरलेसुरले त्यांच्या विरोधात एकत्र येतील. पण, धोका देणाऱ्यांना धडा शिकवू. मी जेव्हाही कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेतले, तेव्हा भाजपला यश मिळाले आहे. निवडणुकांच्या अभियानासाठीच मी येथे आलो असून २०२४ची निवडणूक भाजपच्या विजयासाठी नाही, तर ती समृद्ध भारताचे स्वप्न साकारण्यासाठी असेल." असे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी कोल्हापूरच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर अमित शहा यांनी भाजप विजय संकल्प सभेला संबोधित केले. ते म्हणाले की, "महाविकास आघाडीतील ३ पक्षांसह प्रकाश आंबेडकर आपल्याविरुद्ध लढणार आहेत. मात्र पुढची निवडणूक भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी नाही, पुढची निवडणूक मोदींना पंतप्रधान बनविण्यासाठी नाही. तर २०२४ची निवडणूक महान भारताच्या रचनेसाठी आणि समृद्ध भारत बनवण्यासाठी आहे." असे मत त्यांनी व्यक्त केले.

"दहशतवादावर लढण्याची काँग्रेसच्या राज्यात कोणामध्ये हिंमत नव्हती. काँग्रेस सरकारमध्ये पंतप्रधानांना कोणीही विचारत नव्हते. २००४ ते २०१४पर्यंतच्या काळात कोणाही पंतप्रधानांना पंतप्रधान मानत नव्हते. सगळे स्वत:लाच पंतप्रधान असमजात होते. रोज भ्रष्टाचाराच्या बातम्या येत होत्या. सरकार चालवणाऱ्यांना कळत नव्हते की, कोण आज आपल्या डोक्यात टपली मारेल. दररोज पाकिस्तान भारतात घुसखोरी करत होते. पाकिस्तानविरुद्ध भूमिका घेण्याची कोणाचीच हिंमत झाली नाही. ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवली. गेल्या ९ वर्षांच्या कालावधीत ९ कोटी गरीब महिलांना गॅस सिलिंडर मिळाले. ७० वर्षांनंतर धूरमुक्त वातावरणात त्या महिला श्वास घेत आहेत.’’ असे मत त्यांनी व्यक्त करत विरोधकांना टोला लगावला.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस