महाराष्ट्र

Maratha Reservation: "मी आता आंदोलन करुन कंटाळलो आहे", मराठा आरक्षणासाठी आणखी एकाची आत्महत्या

नवशक्ती Web Desk

राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. असं असताना आरक्षणाच्या मागणीसाठी जागोजागी आंदोलन, साखळी उपोषणे, मोर्चे, रास्ता रोको केला जात आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाज बांधवांना शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच तरुणांना कोणतही टोकाचं पाऊल न उचलण्याचं देखील जरांगे यांनी सांगितलं आहे. असं असताना आरक्षणाची मागणी करत आमत्महत्या केल्याच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीत.

"माझ्या समाजाला हे सरकार आरक्षण देत नाही, म्हणून मी आता आंदोलन करुन कंटाळलो आहे. त्यामुळे मी मरुन जात आहे. मी फाशी घेतली आहे" अशी चिठ्ठी लिहित आत्महत्या केल्याची घक्कादायक घटना घडली आहे. धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील सरमकुंडी येथील तरुणाने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे. विनोद त्र्यंबक गायकवाड असं मयत तरुणाचं नाव आहे.

दोन दिवसांपूर्वी वाशी येथे मनोज जरांगे पाटील यांची वाशी येथे जाहीर सभा पार पडली होती. यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणाला माळी आणि मुस्लीम समाजातील बांधवांनी पाठिंबा दिला होता. अशाता आता आरक्षणासाठी तरुणाने आत्महत्या केल्याने या परिसरातील वातावरण चांगलचं तापलं आहे. गेली दोन दिवस मनोज जरांगे यांच्या सभेचा प्रभाव कायम असताना. या तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे.

विनोद यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करत स्वत:च्या घरातील आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. विनोद यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आत्महत्या करत असल्याचं चिठ्ठीत नमूद केलं आहे.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

विभवकुमारने केली लाथाबुक्क्यांनी मारहाण; स्वाती मालीवाल यांनी नोंदविला 'एफआयआर'

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

छगन भुजबळ नाराज; प्रचारात फारसे सक्रिय नसल्याने चर्चांना उधाण

सिंचन घोटाळ्यात तथ्य, मात्र अजितदादा दोषी नाहीत - फडणवीस