महाराष्ट्र

जितेंद्र आव्हाडांना अटक करा; रिदा रशीद यांची मागणी

आव्हाड यांच्याविरोधात यापूर्वी दाखल करण्यात आलेला विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी त्यांनी आपल्या विरोधात खोट्या गुन्ह्याचा कट रचला असल्याचे रिदा रशीद यांचे म्हणणे आहे.

Swapnil S

ठाणे : भाजप महिला मोर्चाच्या ठाणे उपाध्यक्षा रिदा रशिद यांनी आपल्या विरोधात खोटा गुन्हा रचल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर केला आहे. आव्हाड यांच्याविरोधात यापूर्वी दाखल करण्यात आलेला विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी त्यांनी आपल्या विरोधात खोट्या गुन्ह्याचा कट रचला असल्याचे रिदा रशीद यांचे म्हणणे आहे. आव्हाड यांच्यासह २३ जणांची नावे त्यांनी मुंब्रा पोलिसांना दिली असून त्यांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे जाहीर पत्रकार परिषद घेऊन केली आहे.

मुंब्रा वाय जंक्शन येथील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नोव्हेंबर २०२२ मध्ये पार पडला होता. या सोहळ्यादरम्यान आव्हाडांनी भाजप महिला मोर्चाच्या ठाणे उपाध्यक्षा रिदा रशिद यांना दोन्ही हातांनी पकडून बाजूला हटवले होते. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने त्यांना गर्दीतून बाजूला केले असल्याचे त्यावेळी आव्हाड यांनी स्पष्ट केले होते. मात्र रिदा रशिद यांनी आव्हाडांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र हा गुन्हा मागे घेण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी माझ्या विरोधात खोट्या गुन्ह्यांचा कट रचला होता असा आरोप रिदा रशीद यांनी गुरुवारी घेतलेल्या जाहीर पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात जबाब दिला असून यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यासह २३ जण खोटा गुन्हा रचण्याच्या कटात समिती असल्याचे रिदा रशीद यांनी म्हंटले आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी