Ashadhi Ekadashi 2026 : विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! दादर–पंढरपूर विशेष रेल्वे, पाहा वेळापत्रक 'एआय'ने बनविलेली प्रतिमा
महाराष्ट्र

Ashadhi Ekadashi 2026 : विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! दादर–पंढरपूर विशेष रेल्वे, पाहा वेळापत्रक

आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी मोठी खुशखबर! मध्य रेल्वेने दादर–पंढरपूर विशेष रेल्वेची घोषणा केली आहे. पाहा गाडीचं संपूर्ण वेळापत्रक...

Mayuri Gawade

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे वारकरी आणि भाविकांची लगबग सुरू झाली आहे. २५ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने दादर–पंढरपूरदरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. २४ आणि २६ जुलै रोजी या विशेष फेऱ्या धावणार असून, पुणे मार्गे प्रवास करणाऱ्या भाविकांनाही याचा लाभ मिळणार आहे.

२४ जुलैला दादरहून विशेष गाडी

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१०४५ ही विशेष रेल्वे २४ जुलै रोजी दुपारी १२.५० वाजता दादर स्थानकातून सुटेल. ही गाडी रात्री ९.१५ वाजता पंढरपूर येथे पोहोचणार आहे.

२६ जुलैला पंढरपूरहून परतीची फेरी

परतीसाठी गाडी क्रमांक ०१०४६ ही विशेष रेल्वे २६ जुलै रोजी रात्री १२.१५ वाजता पंढरपूरहून सुटेल. ही गाडी त्याच दिवशी सकाळी ११.४५ वाजता दादर स्थानकावर पोहोचणार आहे.

'या' स्थानकांवर थांबा

या विशेष रेल्वेला ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड आणि कुर्डुवाडी या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे पुणे आणि परिसरातील भाविकांनाही या विशेष सेवेचा लाभ घेता येणार आहे.

डब्यांची रचना आणि आरक्षण

या विशेष गाडीत दोन वातानुकूलित तृतीय श्रेणी (AC 3 Tier), दहा शयनयान (Sleeper), चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन द्वितीय आसनांसह गार्ड ब्रेक व्हॅन अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

या विशेष गाड्यांसाठीचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू झाले आहे. यात्रेदरम्यान प्रवाशांची गर्दी वाढल्यास आवश्यकतेनुसार आणखी विशेष रेल्वे चालविण्याचाही विचार करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'फ्लायदुबई'च्या विमानात थरार; मुंबईकर कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत, जखमी होऊनही वाचवला १७४ प्रवाशांचा जीव

कचरा टाकाल तर दंड भराल! मुंबईत २८ दिवसांत १,३३६ जणांवर कारवाई; १८ लाख ७० हजारांचा दंड वसूल

CNG Price Hike : मुंबईकरांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! CNG महागला; आजपासून मोजावे लागणार जास्त पैसे

२५ सेकंदात घराबाहेरून विद्यार्थिनीला उचललं? अपहरण प्रकरणाला आता वेगळंच वळण; तरुणीने स्वतःच व्हिडिओद्वारे केला खुलासा

Mumbai : उद्यापासून डिजिहेल्थ कनेक्ट अभियान राबवणार; १०० दिवसांत अधिकाधिक नागरिकांचे आभा कार्ड तयार करण्याचे उद्दिष्ट