महाराष्ट्र

Ashok Nete: खासदार अशोक नेते यांच्या वाहनाला टिप्परची घडक ; 'सीटबेल्ट' आणि 'एअरबॅग'मुळे मोठा अनर्थ टळला

नवशक्ती Web Desk

गडचिरोली: गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या वाहनाला भरधाव टिप्परने धडक दिली आहे. मात्र, सीटबेल्टचा वापर केला असल्याने आणि एअरबॅग उघडल्याने खासदार नेते यांच्यासह चालक व सुरक्षारक्षकाचे प्राण वाचले आहेत. शनिवारी सकाळी नागपूरजवळील विहिरीगाव जवळ हा अपघात घडला आहे.

खासदार अशोक नेते हे ३ नोव्हेंबरला मध्यरात्री मुंबईतून नागपूरला पोहोचले. नागपूर येथील शासकीय विश्रामगृहात मुक्काम करुन ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ते गडचिरोलीला जाण्याासाठी निघाले. यावेली विहिरीगाव जवळ त्यांच्या वाहनासमोर अचानक टिप्पर येऊन दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यावेळी नेते यांच्यासह त्यांच्या वाहनात दोन सुरक्षारक्षक व अन्य एक असे पाच जण वाहनात होते.

अपघात झाला त्यावेळी खासदार नेते हे वाहनात समोरच्या सीटवर होते. वाहनाला टिप्परची घडक बसताचं नेते यांच्यासह चालकाची एअर बॅग उघडली. त्यामुळे यामुळे त्यांच्याह गाडीतील पाचजण सुखरुप बचावले. यानंतर अपघास्थळी मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहन तिथेच सोडून खासदार नेते हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत दुसऱ्या वाहनाने गडचिरोलीला निघाले.

दरम्यान, सीटबेल्ट आणि एअरबॅगमुळे आपण थोडक्यात बचावलो असून सुखरुप आहोत. कार्यकर्त्यांनी अजिबात काळजी करु नये असं खासदार अशोक नेते यांनी सांगितलं आहे.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल