महाराष्ट्र

बारामतीचे विमान थेट इंदापूरच्या शेतात... पायलट सुखरूप

वृत्तसंस्था

बारामतीच्या पायलट ट्रेनिंग विमानाने कडबनवाडी (इंदापूर) येथे 'इमर्जन्सी लँडिंग' केले. यामध्ये विमान उडवणारी महिला पायलट भक्ती राहुल राठोड या सुरक्षित असल्याचे समजते. त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या संदर्भात मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, विमान वाहतूक प्रशिक्षण देणाऱ्या कार्व्हर एव्हिएशनच्या या विमानाने बारामतीहून सकाळी उड्डाण केले. यानंतर काही वेळातच इंदापूर येथील कडबनवाडी येथील शेतकरी बारहाटे यांच्या शेतात विमान अचानक उतरले. विमान कोसळले, असे समजून अनेकांनी अपघातग्रस्त विमान पाहण्यासाठी गर्दी केली होती. हे विमान बारामतीतील कार्व्हर एव्हिएशनचे आहे. या संस्थेमार्फत पायलट प्रशिक्षण दिले जाते. विमान शेतात पडल्याचे पाहून तरुण घटनास्थळी पोहोचले. त्यांना प्रशिक्षणार्थी महिला पायलटला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान हे या विमानाला अपघात झाला नसून ते इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

"तर पवारांची औलाद सांगायचो नाही..." उदयनराजेंच्या प्रचारसभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

Terrorist Attack in Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये हवाई दलाच्या वाहनावर हल्ला; एक जवान शहीद, चार जखमी!

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

World Laughter Day 2024: हसत राहा! हसल्याने आरोग्याला होतात अनेक फायदे

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण