महाराष्ट्र

बीडमध्ये बजरंगाची कमाल! पंकजा मुंडेंचा पराभव

Swapnil S

बीड : बीड लोकसभा मतदारसंघात अतिशय चुरशीची लढत झाली. भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे व शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यात फाइट झाली, तर मंगळवारी मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत बीडमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली. बीडमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडेंचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाचे तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेंनी पंकजा मुंडेंचा पराभव केला आहे. बजरंग सोनवणे यांनी ३१व्या फेरीमध्ये ६१२८ मतांची आघाडी घेतली आहे.

भाजप उमेदवार पंकजा मुंडेंकडून बीड, गेवराई विधानसभा मतदारसंघात फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली होती. बीड लोकसभा मतदारसंघात अतिशय अटीतटीच्या लढतीत ३२ व्या फेरीमध्ये निकाल समोर आलाय. ३१व्या फेरीनंतर पंकजा मुंडे ४०० मतांनी आघाडीवर होत्या; मात्र, शेवटच्या फेरीपर्यंत बीडमध्ये ट्विस्टवर ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. पंकजा मुंडे यांनी ३४ हजारांचा लीड घेतला होता. तो बजरंग सोनवणे यांनी ४ ते ५ फेऱ्यांमध्ये मोडित काढला होता.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस