महाराष्ट्र

भाजपचे महाराष्ट्रात १.५ कोटी सदस्य; १.३४ लाख सक्रिय कार्यकर्त्यांची नोंद झाल्याचा दावा

भाजपच्या महाराष्ट्र शाखेने इतिहास रचत १.५ कोटींहून अधिक प्राथमिक सदस्य आणि १.३४ लाखांहून अधिक सक्रिय सदस्य नोंदवले आहेत, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार अरुण सिंह यांनी शुक्रवारी दिली.

Swapnil S

मुंबई : भाजपच्या महाराष्ट्र शाखेने इतिहास रचत १.५ कोटींहून अधिक प्राथमिक सदस्य आणि १.३४ लाखांहून अधिक सक्रिय सदस्य नोंदवले आहेत, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार अरुण सिंह यांनी शुक्रवारी दिली.

ही कामगिरी राज्यातील भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांच्या समर्पणाचे प्रतीक आहे, असे त्यांनी येथील भाजपच्या राज्य मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या संघटनात्मक टप्प्याला मोठे यश मिळाले आहे. भाजपच्या प्राथमिक सदस्यांची संख्या १.५ कोटींच्या पुढे गेली आहे. पक्षाच्या ७० टक्के बूथ समित्या आधीच तयार झाल्या आहेत. २२ एप्रिलपर्यंत १ लाख बूथ समित्या तयार करण्याचे लक्ष्य आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रत्येक बूथवर १२ सदस्य असतील. त्यामुळे एकूण १२ लाख सक्रिय कार्यकर्त्यांची टीम तयार होईल, असे सिंह यांनी नमूद केले. रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, या वर्षी जानेवारीपासून पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी घराघरात जाऊन १.५ कोटी प्राथमिक सदस्य नोंदवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करत आहेत. आम्ही सध्या जवळपास १.४ लाख सक्रिय सदस्यांपर्यंत पोहोचलो असून ३ लाख सक्रिय सदस्यांचे लक्ष्य गाठण्यासाठी काम करत आहोत, असे ते म्हणाले.

Mumbai : रुस्तमजी क्राऊनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी हातोडा; सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमधील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

नारीशक्तीने रोखला शहापूर-मुरबाड-खोपोली महामार्ग; प्रशासनाच्या निषेधार्थ खड्डेमय महामार्गावर साजरी केली मंगळागौर

क्षेपणास्त्र तंत्रज्ञान खासगी उद्योगांना हस्तांतरित; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मंजुरी

कांदा एक्स्प्रेस आज दिल्लीत पोहचणार; ८०० टनाची पहिली खेप, ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांची माहिती

...तर MSME चा निधी पुरवठा ठप्प होईल; ‘एफआयएसएमई’ची भीती; RBI चा NBFC च्या कर्जावर नियंत्रणाचा विचार