महाराष्ट्र

Pune Bopdev Ghat Gang-Rape Case: संशयित आरोपींचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती

तिन्ही संशयित आरोपींचे त्या रात्रीचे एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

Swapnil S

पुणे : पुण्यातील बोपदेव घाटात मित्राबरोबर फिरायला गेलेल्या एका २१ वर्षीय तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेने पुणे हादरलंय. ही घटना गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र, अत्याचार करणारे कोण होते याचा तपास अद्याप लागू शकलेला नाही. पोलिस आरोपींचा कसून शोध घेत आहेत. अशात आता तिन्ही संशयित आरोपींचे त्या रात्रीचे एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

बोपदेव घाटाच्या सासवडच्या बाजूला तीन संशयिताचं एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सीसीटीव्हीमध्ये, एका दुकानासमोरील रस्त्यावर दुचाकी थांबवून तिन्ही आरोपी थांबल्याचे दिसत आहे. रात्री १.३० वाजेच्या सुमारासचे हे सीसीटीव्ही आहे. पण, मुलीवर अत्याचार केल्यानंतरचे हे फुटेज आहे की नंतरचे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र, अत्याचारानंतरचे हे सीसीटीव्ही फुटेज असावे अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, पोलिसांनी पीडित तरुणी आणि तिच्या मित्राने दिलेल्या माहितीच्या आधारे संशयित आरोपींचे स्केच जारी केले आहेत. या आरोपींबाबत काहीही माहिती असल्यास पोलिसांनी जनतेला खालील क्रमांकांवर माहिती देण्याचे आवाहन केले आहे: 8691999689 (विनय पाटणकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोंढवा पोलिस स्टेशन), 8275200947/9307545045 (युवराज हांडे, पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा), आणि युनिट 5 02026122880 (नियंत्रण कक्ष, पुणे शहर पोलीस).

पीडित मुलगी मूळची सुरत येथील असून तिचा मित्र जळगाव येथील राहणारा आहे. दोघेही एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. ती आणि तिचा मित्र गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास बोपदेव घाटामध्ये गेले होते. त्यावेळी तीन अज्ञात तरुणांनी त्यांना अडवले. आरोपींनी मुलीच्या मित्राला बांधून ठेवले व जबरदस्तीने मुलीला येवलेवाडीजवळ नेले. तेथे तिच्यावर त्यांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तरुणीला खडी मशीन चौकात सोडून ते पसार झाले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी