महाराष्ट्र

ब्रिजभूषण सिंह यांना मनसे इंगा दाखवणार?

प्रतिनिधी

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार ब्रिजमोहन सिंह महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने डिसेंबरमध्ये पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे मनसे आक्रमक होऊन ब्रिजमोहन यांचा दौरा उधळून लावण्याची शक्यता आहे, मात्र याला मराठी विरुद्ध उत्तर भारतीय, असे वळण लागू शकते. मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आहे. त्यातच राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज ठाकरे काय भूमिका घेतात, यावर पुढील दिशा ठरणार आहे.

उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी घेतली होती. राज ठाकरे ५ जून रोजी आपल्या पक्षाच्या नेत्यांसह अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. या दौऱ्यात त्यांचा पहिला कार्यक्रम लखनऊमध्ये होणार होता. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही राज भेट घेणार होते, मात्र ब्रिजमोहन यांच्या विरोधामुळे राज ठाकरे यांना अयोध्या दौरा रद्द करावा लागला होता. राज ठाकरे यांनी भाजप अनुकूल भूमिका घेतली असतानाही ब्रिजमोहन यांच्या भूमिकेवर एकही भाजप नेता त्यावेळी उघडपणे बोलला नव्हता. त्यामुळे या मुद्द्यावर मनसे तडजोड करणार नाही. ब्रिजभूषण सिंह यांना मनसे इंगा दाखवणारच, असे बोलले जात आहे. दुसरीकडे राज ठाकरे काय भूमिका घेताहेत, हे महत्त्वाचे ठरणार आहे. कदाचित भाजपचा एखादा नेता दोघांमध्ये मध्यस्थी घडवून आणू शकतो, असेही बोलले जात आहे.

ब्रिजभूषण सिंह हे उत्तर प्रदेशातल्या कैसरगंज येथील भाजपचे खासदार आहेत. शिवाय गेल्या दहा वर्षांपासून ते कुस्ती फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत. २० डिसेंबर ते २५ डिसेंबर दरम्यान पुण्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार आहे. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे या स्पर्धेचे आयोजक आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने ब्रिजमोहन पुण्यात येणार आहेत.

"तर पवारांची औलाद सांगायचो नाही..." उदयनराजेंच्या प्रचारसभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण

Youtuber Elvish Yadav: एल्विश यादवला आणखीन एक झटका, मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल, ED करणार चौकशी!

दोन्ही हात नसतानाही मिळवलं ड्रायव्हिंग लायसन्स, तमिळनाडूच्या तरूणानं कशी साधली किमया?