महाराष्ट्र

नाशिकला कारची ट्रकला धडक; तीन ठार, एक जखमी

जखमीला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, इगतपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.

Swapnil S

नाशिक : जिल्ह्यात मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर कारने ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन ठार, तर एक जण जखमी झाला आहे. इगतपुरी तालुक्यातील बोरटंभे फाट्याजवळ पहाटे सोमवारी ४ वाजण्याच्या सुमारास नाशिकहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने मर्सिडीज गाडी जात असताना हा अपघात झाला. कार पाठीमागून ट्रकला धडकली, यात तीन प्रवासी ठार झाले आणि एक गंभीर जखमी झाला. ट्रकचालकाने अधिकाऱ्यांना माहिती सांगितले की, पोलीस आणि इतर यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या आणि बचावकार्य सुरू केले. जखमीला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, इगतपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत