महाराष्ट्र

राज्यात थंडीची शक्यता

कमाल तापमानात वाढ होईल, किमान तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. १८ जानेवारीनंतर आकाश निरभ्र राहील

Swapnil S

पुणे : राज्यामध्ये या आठवड्यात सर्वत्र आकाश निरभ्र राहणार असून, हवामान कोरडे असेल. मात्र उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे कमाल व किमान तापमानात घट होऊन थंडी काही प्रमाणात पडू शकते.पण थंडीची लाट येण्याची शक्यता नाही. सकाळी व सायंकाळी हवेत गारठा असेल, दुपारी उष्णता जाणवेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

हिंदी महासागराचे व अरबी समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान वाढले असून, ते २९ ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत बऱ्याच भागात कायम आहे. परिणामी राज्यासह दक्षिण भारत व मध्य भारतापर्यंत हवामानात बदल होतील. सध्या अरबी समुद्र व हिंदी महासागरावर चक्राकार वारे वाहत असल्याने या आठवड्यात हवामानत बदल होऊ शकतात. एल-निनोचा प्रभाव सध्या कमी झाला आहे. या पुढील उन्हाळी हंगामात अरबी समुद्राचे व हिंदी महासागराचे तापमान वाढल्यास अवकाळी व अवेळी पावसाची शक्यता निर्माण होण्याची शक्यता आहे.

कमाल तापमानात वाढ होईल, किमान तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. १८ जानेवारीनंतर आकाश निरभ्र राहील. पुणे व परिसरात ४८ तासांत आकाश कोरडे राहील. सकाळी धुके राहण्याची शक्यता आहे. पुण्यातील किमान तापमान शिवाजीनगरला १५.४ अंंश सेल्सिअस नोंदले गेले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक