रेस्टॉरंट्स बंद पडतील असे बोलू नका! महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंढेंना नाव न घेता तंबी 
महाराष्ट्र

रेस्टॉरंट्स बंद पडतील असे बोलू नका! महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंढेंना नाव न घेता तंबी

सावजी हा व्यवसाय विदर्भाची शान आहे. हा रोजगार हजारो कुटुंबांचा आधार असून व्यवसाय बंद पडेल किंवा या उद्योगाला बळीचा बकरा बनवले जाईल, अशी कोणतीही विधाने अधिकाऱ्यांनी करू नयेत, अशी तंबी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना दिली.

Swapnil S

मुंबई : सावजी हा व्यवसाय विदर्भाची शान आहे. हा रोजगार हजारो कुटुंबांचा आधार असून व्यवसाय बंद पडेल किंवा या उद्योगाला बळीचा बकरा बनवले जाईल, अशी कोणतीही विधाने अधिकाऱ्यांनी करू नयेत, अशी तंबी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना दिली.

तुकाराम मुंढे यांनी अमरावती येथील एका कार्यक्रमात बोलताना, मी जर सावजी मटण खाल्ले तर महिनाभर आजारी पडेन आणि हॉस्पिटलमध्ये जावे लागेल, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानामुळे सावजी रेस्टॉरंट चालकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी मुंढे यांचे नाव न घेता त्यांना समज दिली.

विदर्भामध्ये गेली तीन-चार पिढ्यांपासून सावजी रेस्टॉरंट्स अत्यंत प्रामाणिकपणे सुरू आहेत. सावजी ही मसाला आणि अन्नपदार्थ बनवण्याची एक आगळीवेगळी आणि पारंपरिक पद्धती आहे. विदर्भात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सावजीच्या जेवणाचा आस्वाद घ्यावासा वाटतो, असेही ते म्हणाले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग