महाराष्ट्र

चारुतासागर यांचे साहित्य अमूल्य ठेवा : आप्पासाहेब खोत ; १४ वे चारुतासागर साहित्य संमेलन संपन्न

प्रतिभा पोरे यांना राज्यस्तरीय चारुतासागर उत्कृष्ट कथा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Swapnil S

सांगली : चारुतासागर यांचे साहित्य हे एक अमूल्य ठेवा असून तोच वारसा नव्या लिहित्या लेखकांनी निरंतर पुढे चालू ठेवणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक आप्पासाहेब खोत यांनी व्यक्त केले. कवठेमहांकाळ येथे संपन्न झालेल्या १४ व्या चारुतासागर साहित्य संमेलनाप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी प्रतिभा पोरे यांना राज्यस्तरीय चारुतासागर उत्कृष्ट कथा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ लेखक प्रा.यशवंत माळी यांचा अमृतमहोत्सव सोहळ्या निमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला. आप्पासाहेब खोत म्हणाले, “चारुतासागर यांच्या कथा वाचकाला आजही भुरळ घालतात. त्यांच्या कथा वाचकांच्या मनाला अस्वस्थ करून सोडतात. याचे एकमेव कारण म्हणजे त्यांच्या सर्वच कथा या ग्रामीण भागातील सामान्य माणसांचे वास्तव जीवन अचूक टिपून कथेत जसेच्या तसे सांगतात. त्यांची प्रत्येक कथा ही कसरत व दमदार असल्याने ती अधिक प्रभावी झाली आणि वाचकांच्या अभिरुचीस उतरली. या कथा साहित्याची प्रेरणा घेऊन नव्या लिहित्या लेखकांनी चारुतासागर यांची साहित्य परंपरा पुढे चालू ठेवावी.” उद्घाटनपर भाषणात डॉ. जे. डी. म्हेत्रे म्हणाले, “आजच्या युवकांनी मोबाईलच्या आहारी न जाता वाचन, लेखनाचा छंद जोपासावा.”

२४ तासांत आंदोलकांना हटवा! मुंबई उच्च न्यायालयाचा जरांगे यांना अल्टिमेटम; आझाद मैदानात फक्त पाच हजार आंदोलकांना परवानगी

Maratha Reservation : मराठा आंदोलक उतरले रेल्वे रूळावर

घटनात्मक टिकाऊ तोडगा आवश्यक

संकट नव्हे, ही तर संधी...

सप्टेंबर महिना कसा जाईल? बघा मिथुन आणि कर्क राशीचे भविष्य