महाराष्ट्र

"...तेव्हा तर तुम्ही गप्प होता" छगन भुजबळांचं संभाजी राजे छत्रपती यांना प्रत्युत्तर

नवशक्ती Web Desk

जालन्यातील अंबड येथे ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा पार पडली. यात सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लबोल केला होता. याचं पडसाद राज्यभर उमटले. माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी छगन भुजबळ यांना लक्ष्य करत त्यांची मंत्रीपदावरुन हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. याला छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मला आमदारकी आणि मंत्रीपदाची काळजी नाही, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. इगतपुरी येथील सभेला संभोधित करत असताना भुजबळ यांनी हे प्रत्युत्तर दिलं आहे.

छगन भुजबळ हे राज्याचं सामाजित स्वास्थ बिघडवण्याचं काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आललं राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजात नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत. सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का? हे स्पष्ट करावं. अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्रीपदावरुन हकालपट्टी करावी, अशी मागणी संभाजी राजे छत्रपती यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत केली होती.

संभाजी राजे छत्रपती यांना छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. छगन भुजबळ म्हणाले की, मी संभाजी राजे छत्रपती यांचा सन्मान करतो. कारण आमच्या हृदयात मागासवर्गीयांसाठी लढणारे राजर्षी शाहू महाराज आहेत. शाहू महाराजांच्या गादीवर तुम्ही बसले आहात तुम्ही कुठल्याही एका समाजाचे नाहीत. तर सर्वांचे आहात. मग तुम्ही एका समाजाची बाजू घेऊन कसं काय बोलू शकता?

ते पुढे म्हणाले की, आरक्षणाच्या प्रकरणात तु्म्ही पडायला नको होतं. सर्वांचे अधिकार शाबूत ठेवून कुणावरही अन्याय करु नये, ही अपेक्षा संभाजी महाराजांकडून आहे. बीडमधील घरदार मी जाळली का? तेव्हा तर तुम्ही गप्प होता. बीडमधील झालेलं नुकसानीची पाहणी करण्यासाठी तुम्ही जायला हवं होतं. मला आमदारकी आणि मंत्रीपदाची काळजी नाही, असं देखील भुजबळ यावेळी म्हणाले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस