महाराष्ट्र

हा एकनाथ शिंदे गद्दार नाही, वफादार, खुद्दार आहे; मुख्यमंत्री शिंदेंची गोळीबार मैदानात एल्गार

प्रतिनिधी

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीतील खेडमध्ये गोळीबार मैदानावर सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला, तर लाव रे तो व्हिडोओच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंवर टीका केली. मुख्यमंत्री एकनाथी शिंदे म्हणाले की, "एकनाथ शिंदे हा वफादार आहे. हा गद्दार नाही, तर खुद्दार आहे. माझ्या रक्तात बेईमानी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर दत्ताजी शिंदे, महादजी शिंदेंनी बलिदान दिले, ते कधीच मागे नाही हटले. हा मावळा तुमच्यासारखा सत्तेसाठी कधी मिंधा झाला नाही आणि पुढे होणार नाही,"

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "तुम्ही खोके-खोके, गद्दार म्हणून स्वतःची किती पाप झाकणार? बाळासाहेब ठाकरे तुमचे वडील होते, हे किती वेळा सांगणार? हे जगाला मान्य आहे. पण बाळासाहेब तुमचे वडील असले, तरी ते सगळ्या शिवसैनिकांचे दैवत होते. महाराष्ट्रातील जनता तुम्हाला माफ करणार नाही." अशी टीका त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर केली. पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, " स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान राहुल गांधींनी वारंवार केला आणि करत आहेत. पण त्यावर तुम्ही मूक गिळून गप्पा का? तुमच्यावर तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्याची वेळ येते. तुम्हाला माहिती आहे, ज्या मणिशंकर अय्यरने सावरकरांबाबत विधान केले होते, तेव्हा बाळासाहेबांनी त्याला चपलेने झोडले होते. पण राहुल गांधींच्या विधानावर तुम्ही काहीच का बोलत नाहीत? हे कसले तुमचे हिंदुत्व? सावरकरांचा अपमान आम्ही सहन करू शकत नाही, हेही एक कारण आहे आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पाडण्याचे." असे म्हणत त्यांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली.

पुढे ते म्हणाले की, "सत्तेसाठी तुम्ही शिवसेना एनसीपी, काँग्रेसकडे गहाण ठेवली. गद्दारी आम्ही केली नाही, ती २०१९ला तुम्ही केली. हिंदुत्वाचे राजकारण केले, ही चूक झाली असे विधानसभेत उद्धव ठाकरेंनी सांगितले. म्हणजे तुम्ही बाळासाहेबांना चुकीचे ठरवलेत का? बाळासाहेबांच्या भूमिकेला चुकीचे ठरवलेत. कशासाठी? सत्तेसाठी? यापेक्षा या महाराष्ट्राचे दुर्दैव काय असू शकते?" असे म्हणत त्यांनी टोला लगावला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "

काँग्रेसला मोठा धक्का! अरविंदर सिंग लवली यांचा दिल्लीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; 'आप'सोबत युती केल्यामुळे नाराज

सरसंघचालक मोहन भागवत यांचे आरक्षणाच्या मुद्यावरून स्पष्टीकरण; "जोपर्यंत आरक्षणाची गरज..."

उज्ज्वल निकम यांना जळगावातून उमेदवारी द्यायला हवी होती - संजय राऊत

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जनतेच्या मनात सहानुभूती - छगन भुजबळ

Loksabha Election 2024 : भाजपने उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना दिली उमेदवारी; पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया