महाराष्ट्र

पुण्यात महिला पोलीस भरतीवेळी गोंधळ

राज्यातील पोलीस भरती प्रक्रिया पार पडल्यानंतर राज्य कारागृह विभागाची भरती प्रक्रिया पुणे पोलीस शिवाजीनगर मुख्यालय येथील मैदानावर सुरू असताना मोठ्या प्रमाणात तरुणी, त्यांचे पालक, नातेवाईक मैदानाच्या गेटवर आल्याने गोंधळ उडाल्याचा प्रकार बुधवारी पहाटे साडेचार वाजता घडला.

Swapnil S

पुणे : राज्यातील पोलीस भरती प्रक्रिया पार पडल्यानंतर राज्य कारागृह विभागाची भरती प्रक्रिया पुणे पोलीस शिवाजीनगर मुख्यालय येथील मैदानावर सुरू असताना मोठ्या प्रमाणात तरुणी, त्यांचे पालक, नातेवाईक मैदानाच्या गेटवर आल्याने गोंधळ उडाल्याचा प्रकार बुधवारी पहाटे साडेचार वाजता घडला. गर्दीच्या लोंढ्याने प्रवेशद्वाराचे लोखंडी गेट तुडून खाली पडल्याने त्यावरुनच तरुणींचा लोंढा पुढे गेल्याने काही जणींना दुखापत झाल्याचे समोर आले.

बुधवार पहाटे साडेचार वाजल्यापासून महिला पोलीस भरतीसाठी तरुणींना बोलविण्यात आले होते. परंतु मोठ्या प्रमाणात तरुणी व त्यांच्यासह पालक, नातेवाईक शिवाजीनगर पोलीस मुख्यालय मैदानाच्या गेटवर आले. मात्र, ही अभूतपूर्व गर्दी झाल्याने तिच्यावर नियंत्रण राखत आले नाही. त्यातच गेट तुडून खाली पडल्याने त्यावरून तरुणी घसरल्या. यात काही जणी जखमी झाल्याचे सांगण्यात आले.

राज्य कारागृहातील विविध ५१३ जागांसाठी एकूण एक लाख दहा हजार अर्ज पोलिसांकडे आले आहेत. त्यापैकी 36 हजार पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी आतापर्यंत पार पडली असून यामध्ये धावणे व गोळाफेक याचा समावेश होता.

बुधवारपासून पुढील पाच दिवस दररोज चार हजार मुलींना मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात आलेले आहे. बुधवारी चार हजार मुलींपैकी १९०० मुली पोलीस भरतीच्या वेळी प्रत्यक्ष मैदानावर चाचणीसाठी उपस्थित झाल्याची माहिती पोलीस मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली.

लक्ष्मीपूजनाला वरुणराजाचे 'फटाके'! दिवाळीच्या धामधुमीत मुंबई, ठाणे, नवी मुंबईत अवकाळी पावसाचे धुमशान

दिवाळीच्या सणात पावसाची आतषबाजी; शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

दिवाळीनिमित्त मोदींचे देशवासीयांना पत्र; स्वदेशी, भाषा, आरोग्य यासह ऑपरेशन सिंदूरचाही केला उल्लेख

राज ठाकरेंच्या दीपोत्सवावर सरकारची जाहिरातबाजी; मनसेची संतप्त पोस्ट, म्हणाले, "आमच्या पक्षाला...

MMR २०४७ पर्यंत बनणार अग्रगण्य शहरी अर्थव्यवस्था; MMRDA चा विश्वास