महाराष्ट्र

सिद्धू मुसावाला हत्याकांडाचे कनेक्शन पुण्यातील शार्पशूटर्सशी

प्रतिनिधी

पंजाबी गायक सिद्धू मुसावाला हत्याकांडाचे कनेक्शन पुण्याशी असल्याचे उघड झाले आहे. मुसावाला यांची हत्या करणाऱ्या आठपैकी दोन शूटर्स हे पुणे शहरातील आहेत. संतोष जाधव आणि सौरव महाकाळ अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, पंजाब पोलिसांनी जाधव आणि महाकाळ यांची पुणे पोलिसांकडून माहिती मागवली असून, त्यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे. या दोघांनाही ताब्यात घेण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.

मुसेवालाची हत्या करण्यासाठी एकूण चार राज्यांतून शूटर्स पंजाबमध्ये पाठवले होते. तीन शूटर्स पंजाबमधील होते. दोन महाराष्ट्रातले, दोन हरयाणातले आणि यामधील एक शूटर्स हा राजस्थानमधील होता. पंजाबचा गायक सिद्धू मुसेवाला यांची गेल्या रविवारी गोळ्या झाडून हत्या केली होती.

या हत्याप्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पंजाब, राजस्थान, हरयाणा, दिल्लीसह अन्य राज्यांत छापेमारी सुरू आहे. दरम्यान, आतापर्यंत या प्रकरणात आठ शूटर्सची ओळख पोलिसांनी पटवली आहे. त्यात पंजाबमधील तरणतारण येथील रहिवासी असलेल्या मनप्रीत सिंग मन्नूला पोलिसांनी उत्तराखंडमधून अटक केली आहे. शूटर्सना रसद आणि वाहने पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पंजाबमधील तरणतारणमधून जगरूप सिंग याला, तर भटिंडा येथून हरकमल उर्फ रानू याला अटक करण्यात आली. हरयाणाच्या सोनिपत येथून प्रियव्रत उर्फ फौजी आणि मनजीत उर्फ भोलू याला, राजस्थानच्या सीकर येथून सुभाष बनोडा याला अटक केली आहे. पुण्यातील संतोष जाधव आणि सौरव महाकाल यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

मतदारच डिलीट केले! राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर आरोप

मराठा समाजाला मोठा दिलासा! हैदराबाद गॅझेटविरोधातील जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळली

मालेगाव बॉम्बस्फोटातील निर्दोष सुटलेल्या आरोपींना हायकोर्टाची नोटीस

एकनाथ शिंदे अडचणीत; बेकायदा इमारतींना अभय दिल्याचा आरोप, उच्च न्यायालयात याचिका दाखल

...म्हणून मला मोदींना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही! पंच्याहत्तरीनंतरही सक्रिय असलेल्या शरद पवारांचे वक्तव्य