महाराष्ट्र

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी उपमुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा; 'या' योजनेचा घेता येणार लाभ

प्रतिनिधी

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील विकासाचे प्रश्न आणि इतर मुद्द्यांवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ओबीसी विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. आता ओबीसी विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी केली. तसेच, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी किमान ५ वसतिगृह सुरू करण्यासाठी जागा निश्चित करण्यात अली असून लवकरच ते वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी सुरु होतील.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "स्वाधार सारखी योजना आता ओबीसीसाठीही सुरू करत आहोत. विद्यार्थ्यांच्या राहण्याचा, जेवणाचा आणि शिक्षणाचा खर्च हा त्यांना सरळ बँक खात्यांमध्ये पाठवण्यात येणार आहे. याचा फायदा तब्बल ३१ जिल्ह्यांमधील ६०० विद्यार्थ्यांना होणार आहे. पीएचडीसाठी अनुसूचित जाती, मराठा आणि ओबीसी विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते. आता अशीच फेलोशिप आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे." अशा घोषणा त्यांनी यावेळी विधानसभेत केल्या.

काय आहे स्वाधार योजना?

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना' ही महाराष्ट्र शासनाने २०१६-२०१७मध्ये सुरु केली होती. ही एक शैक्षणिक योजना आहे. ११वी, १२वी आणि त्यानंतरच्या शिक्षणासाठी प्रवेश मिळवलेल्या, पण कोणत्याही शासकीय, महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेमध्ये भोजन, राहण्याचा खर्च आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून देण्यात येते.

राज्यात ५५.५४ टक्के मतदान,तिसऱ्या टप्प्यात देशभरात ६२ टक्के मतदान!

Lok Sabha Elections 2024: मतदानादरम्यान मोठा गोंधळ, काँग्रेस नेत्याला मारहाण! बघा VIDEO

कोलकाताच्या खेळाडूंसाठी ‘ते’ २० तास धोक्याचे!

केजरीवालांच्या जामिनावरील निर्णय राखून ठेवला,न्यायालयीन कोठडीत २० मेपर्यंत वाढ!

मोदींनी सांगितले ४०० जागांचे ‘राज’कारण,मुस्लिम आरक्षणावर लालूंना केले लक्ष्य!