संजय पांडे  संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

फडणवीस, शिंदेंना अडकविण्याचे प्रकरण : माजी पोलीस महासंचालक संजय पांडे हायकोर्टात

आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेचे तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप ठेवण्यात आलेले माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी आपल्या विरोधात दाखल झालेले गुन्हे रद्द करावेत, अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

Swapnil S

मुंबई : आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेचे तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप ठेवण्यात आलेले माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी आपल्या विरोधात दाखल झालेले गुन्हे रद्द करावेत, अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह काही पोलीस अधिकाऱ्यांविरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी संजय पांडे तसेच अ‍ॅड. शेखर जगताप यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.

तक्रारदार संजय पूनामिया यांच्यावतीने अ‍ॅड. रिझवान मर्चंट यांनी आक्षेप घेत याचिकेत हस्तक्षेप अर्ज दाखल केला.

गुन्ह्यातील आरोपी

माजी पोलीस महासंचालक संजय पांडे, तत्कालीन विशेष सरकारी वकील शेखर जगताप, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील, पोलीस निरीक्षक मनोहर पाटील, व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल, व्यावसायिक शरद अग्रवाल, व्यावसायिक शुभम अग्रवाल आणि त्यांचे अन्य साथीदार.

Mumbai: कर्जत-कसारा मार्गावरील प्रवाशांना लवकरच दिलासा; १५ डब्यांच्या लोकलबाबत खूशखबर

Mumbai : मोदींच्या उपस्थितीत NESCO मधील इव्हेंटदरम्यान टॉयलेटमध्ये बेशुद्ध पडले होते माजी ऑस्ट्रेलियन मंत्री; तातडीच्या मदतीने वाचला जीव

तरुणांच्या विवाह योगात बिबट्यांचे विघ्न; दहशतीमुळे पुणे जिल्ह्यात विवाहेच्छुक तरुणांना मुली मिळेनात

‘४२ कोटींची वसुली नोटीस कशासाठी?’ मुंढवा जमीन प्रकरणात महसूलमंत्र्यांचे आश्चर्य; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश

Mumbai : नॅशनल पार्कमधील अतिक्रमित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी जागा शोधा; उच्च न्यायालयाचे आदेश