महाराष्ट्र

धाराशिवमध्ये अर्चना पाटील यांना महायुतीची उमेदवारी; निंबाळकर-पाटील यांचा पुन्हा पारंपरिक संघर्ष

Swapnil S

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मराठवाड्यातील धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळणार, याबद्दल बऱ्याच दिवसांपासून चाललेला खल अखेर संपुष्टात आला आहे. महायुतीकडून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाकडून अर्चनाताई पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे यावेळी पुन्हा पाटील-निंबाळकर संघर्ष पाहावयास मिळणार आहे.

माजी मंत्री ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांचे पुत्र तथा तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांचा संघर्ष जुना आहे. मात्र, ज्या-ज्यावेळी या दोन घराण्यातील उमेदवार मैदानात उतरतात, त्या-त्या वेळी मतदारसंघात अटीतटीची लढत होते. यावेळीदेखील तसेच चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे. निंबाळकर यांचा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला. अगोदरपासूनच ते प्रचाराला लागले होते. परंतु विरोधी महायुतीचा उमेदवारच ठरत नव्हता. कधी भाजपने, कधी शिवसेना शिंदे गट तर कधी राष्ट्रवादीने या मतदारसंघावर दावा ठोकून रणनीती आखण्याचे काम सुरू होते. अखेर ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटालाच ही जागा मिळाली असून, त्यांनी थेट डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या सूनबाईंना मैदानात उतरविले. अर्चनाताई पाटील या धाराशिवच्या माजी जि. प. अध्यक्षा आहेत. त्यामुळे त्यांना संधी देण्यात आली आहे.

अर्चनाताई यांचा गुरुवारी सकाळी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि रूपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश दिला. त्यानंतर लगेचच अर्चनाताई पाटील या धाराशिव लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार असतील, असे जाहीर केले. विशेष म्हणजे महायुतीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत ही उमेदवारी जाहीर केली.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत