संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा तब्बल २७ कोटी ३८ लाख कर थकीत

पुणे : तनीषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर पुण्याचे नामांकित रुग्णालय दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. दीनानाथ रुग्णालयाविरोधात आक्रमक आंदोलने करण्यात येत आहेत. त्यातच आता दीनानाथ रुग्णालयाने पुणे महानगरपालिकेचा २०१९ पासूनचा प्रॅापर्टी टॅक्स थकवल्याचे समोर आले आहे. गेल्या ६ वर्षात मंगेशकर रुग्णालय व्यवस्थापनाने कराचा एकही रुपया भरलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे.

Swapnil S

पुणे : तनीषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर पुण्याचे नामांकित रुग्णालय दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. दीनानाथ रुग्णालयाविरोधात आक्रमक आंदोलने करण्यात येत आहेत. त्यातच आता दीनानाथ रुग्णालयाने पुणे महानगरपालिकेचा २०१९ पासूनचा प्रॅापर्टी टॅक्स थकवल्याचे समोर आले आहे. गेल्या ६ वर्षात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व्यवस्थापनाने कराचा एकही रुपया भरला नसून रुग्णालयाने पालिकेचा तब्बल २७ कोटी ३८ लाख रुपयांचा कर असल्याची माहिती समोर आली आहे.

रुग्णालय चालविण्याची जबाबदारी असणाऱ्या लता मंगेशकर मेडिकल फाऊंडेशनने सन २०१९ पासून एकही रुपयांचा कर भरलेला नसल्याचे महापालिकेने सादर केलेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. धर्मदाय रुग्णालयांना मिळकतकर सवलत असल्याचा दावा केला जात असला, तरी महापालिकेने मात्र लता मंगेशकर मेडिकल फाऊंडेशनकडे २७ कोटींची थकबाकी दाखविली आहे.

आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून रुग्णांना वंचित राहायला लागू नये या करिता शासनातर्फे महात्मा फुले आरोग्य योजना राबवली जाते. मात्र, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ‘महात्मा फुले आरोग्य योजने’चा लाभच मिळत नसल्याची देखील धक्कादायक बाब आता समोर आली आहे. मंगेशकर रुग्णालयाने एका रुग्णाला चक्क पेपरवर लिहून दिले आहे की, ‘महात्मा फुले योजनेचा लाभ येथे मिळत नाही.’ परशुराम हिंदू सेवा संघाने यावरती आक्षेप घेत सरकारने सर्वसामान्य आणि गोरगरिबांसाठी घोषित केलेल्या योजनेचं काय? असा सवाल उपस्थित केला आहे. रुग्णालयात रुग्णांना महात्मा फुले योजनेचा लाभ मिळत नसल्याने या रुग्णालयाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे परशुराम हिंदू सेवा संघ तक्रार करणार आहे.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

आजचे राशिभविष्य, ७ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Pune Ganesh Visarjan 2025 : पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत भक्तांचा उत्साह; पारंपरिक जल्लोषात विसर्जन

पालखी निघाली राजाची...लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ; भाविकांना अश्रू अनावर | Video

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद