कोल्हापूर-सांगलीचा पूर रोखणार; ३२०० कोटींची योजना; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा  (Photo-X/@CMOMaharashtra)
महाराष्ट्र

कोल्हापूर-सांगलीचा पूर रोखणार; ३२०० कोटींची योजना; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमधील सातत्याने होणाऱ्या पूरस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी ₹३,२०० कोटींच्या पूर व्यवस्थापन मोहिमेची घोषणा केली.

Swapnil S

मुंबई : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमधील सातत्याने होणाऱ्या पूरस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी ₹३,२०० कोटींच्या पूर व्यवस्थापन मोहिमेची घोषणा केली.

महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश पाऊस साठवण्याची क्षमता वाढवणे आणि कृष्णा व पंचगंगा नद्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता सुधारणे हा आहे.

फडणवीस म्हणाले की, राज्य सरकार आणि जागतिक बँकेने एकत्र मिळून ‘एमआरडीपी’ अंतर्गत आवश्यक ती सर्व तयारी आणि प्रक्रिया पूर्ण केली आहे.

पावसाचे पाणी साठवून ठेवणे, कृष्णा व पंचगंगा नद्यांची वहन क्षमता वाढवणे आणि पर्जन्य जलनिस्सारण यंत्रणा बळकट करणे याद्वारे ही ३,२०० कोटींची मोहीम कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी येथील दीर्घकालीन पूर नियंत्रणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे त्यांनी नमूद केले.

हा परिवर्तनात्मक उपक्रम शक्य करण्यासाठी सहकार्य आणि प्रयत्न केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आर्थिक व्यवहार विभाग आणि जागतिक बँकेचा आभारी आहे. या प्रकल्पाच्या पुढील अंमलबजावणीचे टप्पे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत," असे फडणवीस यांनी लिहिले.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून वाहणाऱ्या कृष्णा नदीला उधाण आल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात या भागात गंभीर पूरस्थिती निर्माण होते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Maratha Reservation : उत्सवात विघ्न नाही; मनोज जरांगेंचा निर्वाळा, अंतरवाली सराटीत आज बैठक, मुंबई आंदोलनाचा कार्यक्रम ठरणार

Mumbai Rain : आजपासून पुन्हा पाऊस; मुंबईत यलो अलर्ट

BRICS Summit 2026 : आजपासून दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषद

Navi Mumbai : सचिवांच्या तोंडाला काळे; MPSC च्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

लंडनमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची घोषणा