महाराष्ट्र

"शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही", मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे शेतकऱ्यांना आश्वासन

जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न केला जाईल, असं देखील मुख्यमंत्री म्हणाले

नवशक्ती Web Desk

अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानासंदर्भात आज विधानसभेत अवकाळीसंदर्भात चर्चा होणार आहे. कांद्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस पियुष गोयलांना, तर मी इथेनॉलसंदर्भात नितीन गडकरींना भेटल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. दुष्काळी, अवकाळी, कांदा, इथेनॉल हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत, असे देखील अजित पवार म्हणाले आहेत. तर सरकार शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिले आहे.

अजित पवार म्हणाले आहेत की, अचानक आलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानाचा मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक होणार आहे. अवकाळी पावसामुळे आतापर्यंत साडेसात लाख हेक्टवर नुकसान झालेले आहे. आज विधानसभेत अवकाळीसंदर्भात चर्चा होणार होईल. इथेनॉलसंदर्भात मी गडकरींना भेटलो. आपण यासंदर्भात सोमवार किंवा मंगळवारी तिथे जाऊन भेटू असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. सध्या आपल्यासमोर दुष्काळी, अवकाळी, कांदा, इथेनॉलसंदर्भात असे महत्वाचे प्रश्न आहेत.

अजित पवार पुढे म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात जे काही अधिकार आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. सगळ्या पालकमंत्र्यांना त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात जाऊन अवकाळीच्या नुकसानची पाहणी करण्यास सांगितले होते. अनेक जिल्हाधिकाऱ्यांशी मी बोललो, तर त्यांनी सांगितले की वॉरफुटिंगवर आमचे काम सुरू आहे. पंचनामे पूर्ण झाल्याशिवाय नुकसानाचे आकडे पुढे येणार नाहीत. एनडीआरएफचे नॉर्म्स मधल्या काळात बदलले आहेत. मुख्यमंत्र्यांनी गेल्या वेळी एनडीआरएफच्या नॉर्म्सच्या विरोधात जाऊन डब्बल मदत केली होती ऊसाचा कोल्हापुर जिल्ह्यासाठीचा प्रश्न सुटला आहे. राजू शेट्टी सांगली जिल्ह्यातील ऊसासाठीचा प्रश्न त्यांनी बसून सोडवावा. मुख्यंमंत्र्यांनी त्यांच्याशी बोलून मधल्या काळात हा प्रश्न सोडवला आहे. आमचा प्रयत्न हाच आहे की कायद्याच्या कसोटीवर ते आरक्षण टिकावे हाच आमचा प्रयत्न आहे.

२२ सप्टेंबरपासून नवे GST दर लागू; कोणत्या वस्तू स्वस्त, तर कोणत्या राहणार स्थिर? वाचा सविस्तर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नवी झळाळी घेऊन येतेय 'मोनोरेल'; पाहा काय आहेत नवे बदल?

UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; घणसोली-शीळफाटा दरम्यान पाच किमीचा बोगदा पूर्ण

Kalyan-Dombivli : रहिवाशांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई - शिंदे