(संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार असल्याचा दावा केला आहे.

Swapnil S

मुंबई : माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार असल्याचा दावा केला आहे. बदलापूर बलात्कार प्रकरण व छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महायुती सरकार अडचणीत आल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्यात येतील, असा दावा त्यांनी केला आहे.

महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या सर्वांनाच विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. ही निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीने अनेक ‘लाडक्या’ योजना जाहीर करीत मोर्चेबांधणी केली आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीतील यशामुळे आत्मविश्वास दुणावलेली महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करा; अर्थमंत्री सीतारामन यांचे प्राप्तिकर विभागाला निर्देश

Nashik : भरधाव ट्रक फ्लायओव्हरवरून थेट ५० फूट खाली कोसळला; सिन्नरमधील भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

महाराष्ट्रात ८७.७९ टक्के मतदार अर्जांचे वाटप पूर्ण; १ लाखाहून अधिक BLO कडून मतदार याद्यांचे पुनरीक्षण

Mumbai : तीन वर्षांची असताना गिळलं टोपण; टीबी-दमा समजून डॉक्टरांनी ७ वर्षे केले चुकीचे उपचार, अखेर मुलीच्या फुफ्फुसाचा भाग काढला

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार