महाराष्ट्र

माजी मंत्री रवींद्र वायकर पोहचले आर्थिक गुन्हे शाखेत; दसरा मेळव्याआधी पोलिसांनी केली चौकशी

चौकशीसाठी माजी मंत्री रविंद्र वायकर आज सकाळी ११ वाजता आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात पोहोचले.

नवशक्ती Web Desk

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांची आज मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली असल्याची माहिती समोर आली आहे. जोगेश्वरी पालिका भूखंड आणि पंचतारांकित हॉटेलचा समावेश असलेल्या ५०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी वायकर यांना समन्स बजावण्यात आलं होते. त्यानुसार रविंद्र वायकर सकाळी ११ वाजता आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात पोहोचले.

वायकर यांच्यावर मुंबई महापालिकेकडून बागेसाठी राखीव असलेल्या भूखंडावर पंचतारांकित हॉटेलच्या बांधकामाची मंजुरी मिळवल्याचा आरोप आहे. या व्यवहारामुळे त्यांनी पालिकेचं नुकसान केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. संबंधित प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेनं यापूर्वीच पालिकेच्या उद्यान आणि इमारत प्रस्ताव विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे. पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाने हॉटेलला बेकायदा मान्यता दिल्याचा आरोप आहे.

रवींद्र वायकर यांनी यापूर्वी सर्व आरोप खोटे व निराधार आहेत असं म्हटलं होतं. माझ्याकडे भूखंडाची सर्व कायदेशीर कागदपत्रं असून कोणत्याही नियमाचं किंवा कायद्याचं उल्लंघन झालं नसल्याची माहिती रविंद्र वायकर यांनी दिली आहे. यामुळे दसरा मेळाव्याआधीचं माजी मंत्री रविंद्र वायकर यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला भेटं द्यावी लागली आहे.

मराठवाड्यात संततधार पाऊस; गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : आयोजक व मॅनेजरवर लुकआउट नोटीस जारी; मुख्यमंत्री सरमा म्हणाले, अन्यथा...

MPSC ची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली