महाराष्ट्र

खासगी ट्रॅव्हल्स रडारवर! गणेशोत्सवात जादा पैसे आकारल्यास कारवाई – सरनाईक

दरवर्षी गणेशोत्सवात एसटी महामंडळाच्या १५०० हून अधिक कोकणवासीयांच्या चालवण्यात गाड्या सेवेत येतात. मात्र कोकणात जाणाऱ्यांची संख्या पाहता, या गाड्याही अपुऱ्या पडतात. एसटी गाड्यांची कमतरता लक्षात घेता, खासगी ट्रॅव्हल्स प्रवाशांकडून अधिकचे पैसे आकारले जातात. मात्र यंदा गणेशोत्सवात खासगी ट्रॅव्हल्सने प्रवाशांकडून अधिकचे पैसे आकारले, तर संबंधित ट्रॅव्हल्सवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : दरवर्षी गणेशोत्सवात एसटी महामंडळाच्या १५०० हून अधिक कोकणवासीयांच्या चालवण्यात गाड्या सेवेत येतात. मात्र कोकणात जाणाऱ्यांची संख्या पाहता, या गाड्याही अपुऱ्या पडतात. एसटी गाड्यांची कमतरता लक्षात घेता, खासगी ट्रॅव्हल्स प्रवाशांकडून अधिकचे पैसे आकारले जातात. मात्र यंदा गणेशोत्सवात खासगी ट्रॅव्हल्सने प्रवाशांकडून अधिकचे पैसे आकारले, तर संबंधित ट्रॅव्हल्सवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच खासगी ट्रॅव्हल्सला पाठीशी घालणाऱ्या वाहतूक अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. दरम्यान, गणेशोत्सवात कोकणात अधिकच्या बसेस चालवण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यंदा २७ ऑगस्ट रोजी लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी होत असते. मात्र एसटी महामंडळाकडे एसटी गाड्यांची कमतरता लक्षात घेता, खासगी ट्रॅव्हल्स कोकणात जाणाऱ्या भाविकांकडून अधिकचे पैसे आकारत असल्याच्या तक्रारी दरवर्षी प्राप्त होत असतात. यंदाही गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असणार आहे. एसटीच्या गाड्यांच्या अपुऱ्या संख्येचा फायदा घेत यंदाही खासगी ट्रॅव्हल्स अवाच्या सव्वा पैसे आकारून घेणार, अशी चिंता कोकणवासीयांनी व्यक्त केली आहे. मात्र कोकणात जाण्यासाठी एसटीच्या जादा गाड्या चालवण्यात येणार आहेत. गणेशोत्सवात कोकणवासीयांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी महामंडळ सज्ज असून गरजेनुसार गाड्यांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

वाहतूक अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार

उत्सवाच्या काळात बहुतांशी खासगी ट्रॅव्हल्स हे वाहतूक अधिकाऱ्यांशी साटेलोटे करून चाकरमान्यांना लुटतात. याबाबतच्या तक्रारी दरवर्षीच ऐकायला येतात. पण आता खासगी ट्रॅव्हल्सकडून अधिकचे पैसे आकारल्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास, संबंधित वाहतूक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा सरनाईक यांनी दिला आहे.

THANE : रामनवमीनिमित्त ट्रॅफिक निर्बंध; वागळे परिसरातील अनेक रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Ram Navami 2026 : श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मुंबईत २००० ड्रोनचा भव्य शो; काय असणार खास? जाणून घ्या वेळ आणि स्थळ

केंद्र सरकारचा निर्णय; घरात PNG असेल तर LPG पुरवठा बंद, गॅस कनेक्शनवर नवे नियम लागू

Mumbai : ८७० रुपयांच्या वादातून संतापजनक प्रकार; ओशिवरामध्ये सिगारेट विक्रेत्याला कारने फरफटत नेले, घटना CCTV मध्ये कैद

मुंबईकरांना दिलासा; मेट्रो 2Bमुळे चेंबूर परिसरातील प्रवास होणार जलद