एक्स @SunetraA_Pawar
महाराष्ट्र

ग. दि. कुलथे अनंतात विलीन

राज्यातील सर्व शासकीय राजपत्रित अधिकाऱ्यांची अधिकृत शिखर संघटना महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, मुख्य मार्गदर्शक, सल्लागार गणपत दिनकर कुलथे यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने तसेच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या नेरूळ येथील राहत्या घरी सोमवारी निधन झाले.

Swapnil S

नवी मुंबई : राज्यातील सर्व शासकीय राजपत्रित अधिकाऱ्यांची अधिकृत शिखर संघटना महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, मुख्य मार्गदर्शक, सल्लागार गणपत दिनकर कुलथे यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने तसेच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या नेरूळ येथील राहत्या घरी सोमवारी निधन झाले. मंगळवारी त्यांच्यावर नेरूळ येथील शांतीधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुलथे कुटुंबीयांसमवेत विविध शासकीय विभागातील अधिकारी-कर्मचारी, विविध संलग्न संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी तृतीय श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विश्वास काटकर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, राजपत्रित अधिकारी महासंघाचे माजी अध्यक्ष रवींद्र धोंगडे, विद्यमान अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर

भाटकर, दुर्गा मंचच्या अध्यक्षा डॉ. सोनाली कदम, माजी माहिती संचालक देवेंद्र भुजबळ आदींनी यावेळी स्वर्गीय कुलथे यांच्याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण

मुंबईत घुसले १४ दहशतवादी, ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्बस्फोट घडवणार; अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना धमकी

Mumbai : लालबागच्या राजाचे अंतिम दर्शन घ्यायचे आहे? मग 'या' मार्गावर द्या बाप्पाला शेवटचा निरोप!

ओबीसी महासंघाचे उपोषण मागे; राज्य सरकारकडून १४ पैकी १२ मागण्या मान्य

बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती; पूर आणि भूस्खलनावर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी