महाराष्ट्र

गौतम नवलखा यांना अखेर जामीन

Swapnil S

मुंबई : भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणात शहरी नक्षलवादाच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेले मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांना उच्च न्यायालयाने अखेर दिलासा दिला. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या खंडपीठाने सशर्त जामीन मंजूर केला. तसेच या निर्णयाविरोधात एनआयएला सर्वोच्च न्यायालयात दाद मागता यावी म्हणून आपल्याच निर्णयाला तीन आठवड्यांची स्थगिती दिली. सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए न्यायालयाने गेल्यावर्षी जामीन अर्ज  फेटाळल्यानंतर नवलखा यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल करत आव्हान दिले होते. त्या याचिकेची उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात घेत एनआयए न्यायालयाच्या आदेशातील त्रुटींवर बोट ठेवत नवलखा यांच्या जामीन अर्जावर नव्याने सुनावणी करण्याचे निर्देश दिले होते.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस