महाराष्ट्र

समृद्धी महामार्गावरील गर्डर कोसळला; १४ ठार , ३ जण जखमी

या घटनेमुळे खळबळ उडाली असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली

नवशक्ती Web Desk

शहापूर तालुक्यात सरलांबे येथील समृद्धी महामार्गाच्या पुलाचे काम सुरू असताना मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाला. गर्डन मशिन जॉईंट करणारा क्रेन व स्लॅब शंभर फुटावरून खाली कोसळला. त्या खाली चिरडून १४ जण ठार झाले. इतर तीन जण जखमी असून त्यांना ठाणे येथील कालव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेमुळे खळबळ उडाली असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पुलाचे बांधकाम रात्रीही सुरू होते, मात्र सुरक्षतेच्या उपाययोजना केल्या गेल्या नसल्यामुळे गरीब कामगारांना आपल्या जीवाला मुकावे लागले, असा आरोप होत आहे.

लवकरच १० आणि २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा; एक अब्ज पॉलिमर नोटांच्या चाचणीला मंजुरी; अर्थमंत्री सीतारामन यांची माहिती

मुंबई, ठाणे, कोकणात आज 'कोसळ'धार; पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

Air India Flight Turbulence : 'त्या' पायलटने घेतला होता गांजा

मराठे फक्त प्रचारासाठीच आहेत का? - मनोज जरांगे

पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांनी लक्ष द्या! मिसिंग लिंक आज अंशत: बंद; वाचा सविस्तर