मुंबई : केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्यात यावी. महागाई भत्ता १ जुलै २०२४ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्याचे महासंघाचे सरचिटणीस समीर भाटकर यांनी सांगितले.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १ जुलै २०२४ पासून ३ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना देखील ही वाढ पूर्वलक्षी प्रभावाने या आधीच लागू करण्यात आली आहे.