महाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणूक निकालाला गालबोट; जळगावमध्ये दगडफेकीत एकाचा मृत्यू

आज ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचा दिवस, पण हा दिवस जळगावमधील टाकळी गावाला कटू आठवणीमुळे लक्षात राहील

प्रतिनिधी

आज ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाचा दिवस. अशामध्ये एकीकडे विजयाचा गुलाल उधळत असताना दुसरीकडे हा दिवस जळगावमधील एका गावासाठी कला दिवस ठरला. जामनेर तालुक्यातील टाकळी गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गटांमधील कार्यकर्ते आपसात भिडले. यावेळी दोन समुहांकडून दगडफेक देखील करण्यात आली. यामध्ये एका भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे ग्रामपंचायत निवडणूक निकालाला गालबोट लागले आहे.

जळगावच्या जामनेर तालुक्यात टाकळी गावामध्ये दोन गटात शाब्दिक चकमक सुरु झाली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी परस्परांवर दगडफेक सुरु केली. या दगडफेकीत अनेक कार्यकर्ते जखमी झाले. त्यांच्यामधील २८ वर्षाचा धनराज माळी हा कार्यकर्ता गंभीर जखमी झाला होता. कार्यकर्त्यांनी त्याला सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच रुग्णालयातच इतर कार्यकर्त्यांनी आणि नातेवाईकांनी टाहो फोडला.

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; नोंदी असलेल्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार

‘देवाभाऊ’ कॅम्पेनवरून जोरदार वादंग; जाहिरात देणारा भाजपच्या मित्रपक्षाचा मंत्री - रोहित पवार

मुंबईला मिळणार वातानुकूलित वंदे मेट्रो; २ हजार ८५६ डब्यांच्या खरेदीची निविदा जाहीर

निवडणूक आयोग भाजपचे कार्यालय बनले का? मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

अस्तित्व वाचवण्यासाठी ओमी कलानींची धडपड; अखेर युतीसाठी शिंदे गटाचा दरवाजा ठोठावला