महाराष्ट्र

जितेंद्र आव्हाड यांना हायकोर्टाचा झटका, गुन्हा रद्द करण्यास नकार; पालिका अधिकाऱ्याला मारहाण

पालिका अधिकाऱ्यांना मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना उच्च न्यायालयाने झटका दिला.

Swapnil S

मुंबई : पालिका अधिकाऱ्यांना मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना उच्च न्यायालयाने झटका दिला. न्यायमूर्ती अजय गडकरी व न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने ठाणे पालिकेतील सहाय्यक आयुक्त महेश अहेर यांना मारहाण केल्याप्रकरणी नोंदवलेला गुन्हा रद्द करण्याची आव्हाड यांची विनंती फेटाळून लावली.

या प्रकरणी आव्हाड यांच्याविरुद्धात १५ फेब्रुवारी २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपांत तथ्य नसल्याचा दावा करताना हा गुन्हा रद्द करण्यास अहेर यांची संमती असल्याचे सांगून आव्हाड यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी व न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेही राज्य सरकारच्या वतीने या कथित मारहाणीचा तपास प्राथमिक टप्प्यात असून, या प्रकरणात अद्याप आरोपपत्र दाखल केलेले नाही, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. याची गंभीर दखल खंडपीठाने घेतली.

गुन्हा रद्द करण्यास सरकारी अधिकारी संमती कसा काय देऊ शकतो? असा प्रश्‍न उपस्थित करत गुन्हा रद्द करण्यास नकार दिला.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री