महाराष्ट्र

"म्हातारा तिजोरीची किल्ली..."; सदाभाऊ खोत यांची जोरदार फटकेबाजी

Swapnil S

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. 'म्हातारा लय खडूस आहे, तिजोरीची किल्ली कंबरेला लावून हिंडतोय, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी (२६ एप्रिल) माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारसभेत केली.

सदाभाऊ खोत म्हणाले, "ही लढाई खऱ्या अर्थाने वाडा विरूद्ध गाव गाडा आहे. ही लढाई प्रस्थापित विरूद्ध विस्थापितांची लढाई आहे. काय काय म्हणतात की, साहेबांचे वय ८४ आणि आता ८४ सभा घेणार आहे. आता साहेबाला काय काम आहे. त्यांना काय म्हसरं राखायची आहेत की, पाणी पाजायचे आहे. हाच धंदा करायचा आहे. पण, साहेबाला मानावे लागेल, या वयात पण आमच्या सारख्याला चान्स देत नाही".

"या वयात बापपण पोरगा कर्तबगार झाला की, प्रपंच त्यांच्या हातात देतो आणि गप्प बसतो. पण हा म्हातारा लय खडूस आहे. तिजोरीची किल्ली कंबरेला लावून हिंडतोय. अजित दादा किल्लीकडे बघून बघून म्हातारे झाले. मग अजित दादाच्या लक्षात आले की, हा म्हातारा कंबरेची किल्ली काढत नाही. म्हणून दादा आता किल्लीला लोंबकळत म्हणतोय की, किल्ली तोडल्याशिवाय थांबणार नाही. कारण आता हे बास झालं, अरे आम्हालापण प्रपंच करू द्या. काय म्हातारा झाल्यावर प्रपंच करायचा का? आणि म्हणून दादासुद्धा विकासासाठी भाजपसोबत आले आहेत", असेही खोत म्हणाले. त्यांचे हे भाषण सध्या चर्चेत आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे तर, धैर्यशील मोहिते-पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. या दोघांमध्ये चुरशीची लढत पहायला मिळते आहे.

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिन,का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या महत्त्व

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान