महाराष्ट्र

महिलेस जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण करणारे चौघे पोलिसांच्या ताब्यात ; अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

नवशक्ती Web Desk

साताऱ्यातील म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. भरचौकात जातिवाचक शिवीगाळ करून एका महिलेस लाथांनी व उसाच्या व लाकडी दाडक्याने मारहाण करीत विनयभंग केल्याप्रकरणी पानवण (ता. माण) येथील चार जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या पैकी फरार झालेल्या संशयित आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे.

म्हसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पानवण येथील म्हसवड पोलिस ठाण्यात एकाने या प्रकरणाची सविस्तर तक्रार दिली होती. शनिवारी ( २६ ऑगस्ट) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पानवण येथील महालक्ष्मी खताच्या दुकानासमोर फिर्यादीची आई जनावरांसाठी कडवळ घेण्यासाठी दिलेले पैसे देवदास रोहिदास नरळे यास परत मागितले. त्याचा राग मनात धरून देवदास रोहिदास नरळे, (पिंटू) ऊर्फ शांताराम रोहिदास नरळे, संतोष गोपाळ नरळे, जनाप्पा विठ्ठल शिंदे (सर्व रा. पानवण) यांनी एकत्र येऊन फिर्यादीच्या आईचे केस धरून तिला खेचत रस्त्याच्या मधोमध आणून अमानूष मारहाण केली. महिलेला आणि तिच्या मुलांना आरोपींनी मारहाण करत जातिवाचक शिवीगाळ केली.

याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात चार जणांवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा (Atrocity Act) दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील दोघांना याआधीच पोलिसांनी अटक केली होती. तर दोन फरारी संशयितांचा शोध सुरू होता. दरम्यान, पोलिसांनी फरार असणाऱ्या दोघाच्या मुसक्या आवळल्या आहेत. या गुन्ह्यात आतापर्यंत चार जणांना अटक झाली असून पानवण गावात अधिक कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त