महाराष्ट्र

जमावाच्या मारहाणीत २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू; जामनेरमध्ये तणाव

जामनेर येथे पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी आलेल्या बेटावद खुर्द येथील सुलेमान रहिमखान पठाण (२१) या तरुणाला संशयावरून काही तरुणांनी बेदम मारहाण केली. घरी परतल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर जामनेरमध्ये तणाव निर्माण झाला.

Swapnil S

जळगाव : जामनेर येथे पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी आलेल्या बेटावद खुर्द येथील सुलेमान रहिमखान पठाण (२१) या तरुणाला संशयावरून काही तरुणांनी बेदम मारहाण केली. घरी परतल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर जामनेरमध्ये तणाव निर्माण झाला. पोलीस तपासात दहा संशयितांची नावे समोर आली असून, त्यापैकी दोघांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

सुलेमान पठाण हा बारावी उत्तीर्ण असून पोलीस भरतीची तयारी करत होता. सोमवारी तो अर्ज दाखल करण्यासाठी जामनेरला आला होता. एका कॅफेत बसला असताना काही तरुणांनी त्याला बाहेर खेचत मारहाण करण्यास सुरुवात केली. बस स्थानकातही त्याला मारहाण झाल्याचे सांगितले जाते.

घरी बेटावद खुर्दला परतल्यावर त्याने पालकांना घटना सांगितली, पण काही वेळातच तो कोसळला. तातडीने जामनेर उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर एका समुदायाने जामनेर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी जाऊन जमाव शांत केला. सुलेमानच्या मृत्यूप्रकरणी वडील रहीमखान पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, संशयितांपैकी दोघांना ताब्यात घेतले आहे.

सिराज, बुमरासमोर विंडीजचे लोटांगण; पहिल्या दिवसावर भारताचे वर्चस्व

पक्षप्रमुख नव्हे, हे तर कटप्रमुख; एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल, मुंबई मनपावर महायुतीचा झेंडा फडकविण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन

मराठी माणसात फूट पडू देणार नाही - उद्धव ठाकरे; मनसेसोबतच्या युतीचा पुनरुच्चार

स्वदेशी, स्वावलंबनाला आता पर्याय नाही - भागवत; देशाची सुरक्षा क्षमता वाढवण्याचा सल्ला

ओला दुष्काळ जाहीर होईपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही; दसरा मेळाव्यात मनोज जरांगे यांचा इशारा