महाराष्ट्र

ताडोबातील जंगल सफारी आता इको फ्रेेंडली; ३०० विद्युत वाहने वन विभागाच्या ताफ्यात येणार

Swapnil S

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आता लवकरच जंगल सफारीसाठी विद्युत वाहने वापरली जाणार आहेत. यामुळे पर्यटकांना जंगलातील प्राण्यांच्या आवाजांचा आनंद घेता येईल. सफारी वाहनांच्या इंजिनाच्या आवाजाने जंगली प्राणी विचलित होतात. पण विद्युत वाहनांमुळे पर्यटकांना प्राण्यांना जवळून अनुभवणेही शक्य होणार आहे.

चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील ३०० सफारी वाहनांपैकी चार जणांनी त्यांच्या जिप्सींचे पेट्रोलवरून बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांमध्ये रूपांतर केले आहे. पर्यावरणपुरक सफारीचा हा उपक्रम आर्थिकदृष्ट्या अधिक फायद्याचा आहे, असे वन अधिकाऱ्याने सांगितले. प्रत्येक सफारी वाहनात सहा पर्यटक असतात आणि वाघांच्या दर्शनासाठी राखीव क्षेत्राच्या बफर आणि कोअर झोनमध्ये दररोज दोन फेऱ्या होतात, असे अधिकाऱ्याने सांगितले.

याबद्दल अधिक माहिती देताना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक कुशाग्र पाठक यांनी सांगितले की, आम्ही आधी आमचे वाहन विद्युत वाहनात रूपांतरित केले आणि नंतर तीन महिन्यांपर्यंत त्याची चाचणी केली. समाधानकारक निकालानंतर, आम्ही जिप्सीधारक ग्रामस्थांना हिरवेगार होण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी चार जण या बदलासाठी तयार होते. वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी जिप्सी मालकांना नाममात्र व्याजदराने कर्ज दिले होते.

चार जिप्सींचे बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांमध्ये रूपांतर करण्यात आले आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी पर्यटकांना नेण्यास सुरुवात केली, असे ते म्हणाले. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत वैधानिक प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार असलेल्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) या संबंधात व्याघ्र प्रकल्पातील उत्सर्जन कमी करण्यासाठी बॅटरीवर चालणारी वाहने चालवण्याचा प्रस्ताव होता, असेही ते म्हणाले.

वाहनचालक सादिक बेग म्हणाले की, पेट्रोल भरण्यासाठी आता ३० किमी दूर असलेल्या चंद्रपूरला जाण्याची गरज नाही. तसेच तेथे जाऊन पेट्रोलचे कॅन घेऊन परत येण्याचीही आवश्यकता नाही. विद्युतीकरणामुळे जिप्सीवरील पर्यटक मार्गदर्शकाशी संवाद साधू शकतात आणि कोणत्याही इंजिनाच्या आवाजाच्या व्यत्ययाशिवाय निसर्गातील आवाज कानात साचवून ठेवण्याचा आनंद घेता येईल. पेट्रोलवरील वाहनांच्या आवाजामुळे प्राणी पळून जातात. माझ्या जिप्सीच्या बाबतीत असे नाही. पर्यटक आता ई-जिप्सीला प्राधान्य देतात आणि त्यांना फिरण्यासाठी अशा वाहनांची मागणी करतात.’’

आता खर्च अवघ्या १५० रुपयांचा

बेग यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक जिप्सी चालकाला एका सफारीसाठी २७०० रुपये मिळतात. प्रत्येक सफारीसाठी मी जवळपास १००० रुपये इंधन खर्च करायचो. आता माझे वाहन विद्युत असल्यामुळे खर्च दिवसाला सुमारे अवघ्या १५० रुपयांवर आला आहे. तसेच, मी माझ्या वाहनाचे चार्जिंगही माझ्या घरीच करतो. जिप्सी रात्रीतून किंवा दोन सहलींदरम्यान चार्ज केली जाते. ई-वाहन एका चार्जवर १२० किमी अंतर कापू शकते, असे ते म्हणाले.

मुंबई कुणाची? राज्यातील १३ मतदारसंघांत मतदान; महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार चुरस

'हे' बॉलिवूडकर भारतात करू शकत नाहीत मतदान!

Akshay Kumar Voting: या वर्षी अक्षय कुमारने प्रथमच मतदान केले, म्हणाला, "माझा देश विकसित झाला पाहिजे"

राहुल आणि अखिलेश यांच्या सभेत गोंधळ; भाषण न करताच निघून जाण्याची पाळी

काश्मीरमध्ये मतदानापूर्वी दहशतवादी हल्ले; भाजप कार्यकर्त्याची हत्या