महाराष्ट्र

राज्यातील रुग्णांच्या मृत्यूंप्रकरणी उच्च न्यायालयाला पत्र ; पत्राची दखल घेत याचिका दाखल करण्याचे न्यायालयाचे निर्देश

ऍ़ड. मोहित खन्ना यांनी मंगळवारी हे पत्र मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. आरिफ डॉ. यांच्या खंडपीठापूढे सादर केलं होतं.

नवशक्ती Web Desk

राज्यात नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णायात आणि छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी रुग्णालय येतील मृत्यूवरुन राज्यभरात वातावरण तापलं आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्हा उपस्थित होतील अशा घटना वारंवार घडताना दिसत आहेत. अशात या घटनांची राज्यातील उच्च न्यायालयांनी दखल घ्यावी, याकरिता एका वकिलाने पत्र लिहिलं आहे. आता न्यायालयाने या पत्राची दखल घेत संबंधित वकिलांना यासंदर्भात याचिका दाखल करण्याचे निर्देश बुधवारी दिले. ऍ़ड. मोहित खन्ना यांनी मंगळवारी हे पत्र मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. आरिफ डॉ. यांच्या खंडपीठापूढे सादर केलं होतं.

खन्ना यांनी न्यामुर्तींनीना लिहिलेल्या पत्रात नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ३० सप्टेंबरपासून अर्भकांसह ३१ मृत्यू आमि २ ते ३ ऑक्टोबर दरम्यान छत्रपती संभाजीनगर शासकीय रुग्णालयात किमान १४ मृत्यूंबाबत चिंता व्यक्त केली आहे. या पत्रात त्यांनी ठाणे महापालिकेच्या नियंत्रणात असलेल्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज मेमेरियल रुग्णालयात ऑगस्टमध्ये २४ तासांत १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा देखील उल्लेख करण्यात आला आहे.

रुग्णांलयांनी माध्यमांसमोर दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांच्याकडे बेड, वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर व अन्य वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याचा उल्लेख केला आहे. या सुविधांचा अभाव असणं म्हणजे राज्य घटनेने बहाल केलेल्या जीवन जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन होय. राज्य सरकार त्यांचं कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरल्याचं खन्ना यांनी या पत्रात म्हटलं आहे. उच्च न्यायालयाने या संदर्भात याचिका दाखल करावी, असं म्हणत खन्ना यांना याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या