महाराष्ट्र

लोकसभेतील घुसखोरीचे महाराष्ट्रात पडसाद, नागपूर अधिवेशनात गॅलरी पास बंद, आता फक्त...

नवशक्ती Web Desk

देशातील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या संसदेत दोन अज्ञानांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या मारल्या आणि एकच गोंधळ उडाला. यानंतर या दोघांनी खासदारांच्या बेंचवरुन उड्या घेत लोकसभा अध्यक्षाच्या दिशेने जायला सुरुवात केली. यावेळी काही खासादारांनी या दोन्ही युवकांना घेरलं. यानंतर यांनी त्यांच्या बुटातून स्मोक कॅन बाहेर काढले आणि सभागृहात धूर केला. या घटनेमुळे संसदेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.संसदेत घडलेल्या या प्रकारानंतर महाराष्ट्रातील नागूपर येथे सुरु असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात त्याचे पडसाद उमटले आहे. राज्य विधिमंडळ सभागृहाचे गॅलरी पासेस देणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसाठी गॅलरी पास देणं बंद केलं आहे.विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी सभागृहात याबाबतची माहिती दिली आहे.

संसदेच घडलेल्या या प्रकाराचे देशभर पडसाद उमटताना दिसत आहेत. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनात देखील याबाबत प्रश्न उपस्थित केला. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी संसदेतील सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. आपणही याबाबत काळजी घ्यायला हवी असं म्हणाले. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, मी सुद्धा वारंवार सर्व सदस्यांना विनंती केली आहे की आवश्यक असलीत तेवढेच व्हिजीटर्स पास काढून घ्या. अधिकच्या पासेसची मागणी कोणीही करु नका.

विधानसभा अध्यक्षाच्या प्रतिक्रियेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या मुद्यावर भाष्य केलं. ते म्हणाले, माझी विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींना विनंती आहे की, आपण विधीमंडळाचे पासेस कमी करायला हवेत. अजित पवार यांनी केलेल्या मागणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, आजपासून प्रत्येक आमदाराला जास्तीत जास्त दोन पासेस दिले जातील. या व्यतिरिक्त पास दिला जाणार नाही. दरम्यान, अधिवेशन कालावधीत विधिमंडळाच्या परिसरात गर्दी नको आणि सुरक्षा यंत्रणेवर अधिक भार पडू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

संसदेत नेमकं काय घडल?

शुन्य प्रहरादरम्यान भाजप खासदार खरगेन मुर्मू बोलत असताना एका व्यक्तीने लोकसभेतील प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली. यानंतर त्याच्या मागे लगेच दुसऱ्या वक्तीने देखील उडी मारली. यानंतर सभागृहात एकच खळबळ उडाली. काही खासदारांनी मिळून या दोघांना पकडून सुरक्षा रक्षकांच्या हवाली केलं. यानंतर संसदेच्या बाहेरच्या आवातून देखील एकाल ताब्यात घेण्यात आलं. या घुसखोरांना संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांच्या अँटी टेरर युनिटच्या स्पेशल सेलकडून या घुसखोरी करणाऱ्यांची चौकशी सुरु आहे.

22 वर्षापूर्वी झालेल्या हल्लाच्या दिवशीच या तरुणांनी संसदेत घुसखोरी केल्यानं आणि गलरीतून सदस्यांच्या बेंचवर उड्या मारल्याने एकच गोंधळ उडाला. यामुळे संसदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. दरम्यान, या तरुणांनी हे कृत्य का केलं? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिन,का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या महत्त्व

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

Marathi Serial: लोकप्रिय मालिका 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' प्रेक्षकांपुढे येणार नवीन अवतारात!