लोणावळा-कर्जत दरडग्रस्त मार्गामुळे १७ जुलैपर्यंत गाड्यांच्या मार्गात बदल संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

लोणावळा-कर्जत दरडग्रस्त मार्गामुळे १७ जुलैपर्यंत गाड्यांच्या मार्गात बदल

लोणावळा-कर्जत रेल्वे मार्गावर ६ जुलैला झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

Swapnil S

मुंबई : लोणावळा-कर्जत रेल्वे मार्गावर ६ जुलैला झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. सध्या दुरुस्त करण्यात आलेल्या एकाच मार्गावरून रेल्वे वाहतूक सुरू असून दुसरा मार्ग पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेने ११ ते १७ जुलै या कालावधीत अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग बदलणे तसेच काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट आणि शॉर्ट ओरिजिनेट करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवाशांना अल्पसूचनेवर होणाऱ्या बदलांमुळे गैरसोय होऊ नये आणि त्यांना प्रवासाचे नियोजन करता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

यानुसार विशाखापट्टणम-मदुराई-एलटीटी, एलटीटी, कराईकल-एलटीटी, एमजीआर चेन्नई-एकतानगर, चेन्नई-अहमदाबाद, सिकंदराबाद-राजकोट, राजकोट-कोइम्बतूर, पोरबंदर-सिकंदराबाद, एमजीआर पुणे-संतरागाछी, संतरागाछी-पुणे आदी अनेक गाड्या दौंड-मनमाड-इगतपुरी-कल्याण तसेच दौंड-मनमाड-जळगाव-पाळधी-सुरत आणि इतर पर्यायी मार्गांवरून वळवण्यात आल्या आहेत.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Video : नेपाळमध्ये महाप्रलय! भोटे कोशी नदीला अचानक महापूर; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती, किमान १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता

शासकीय, खासगी, धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिट; तातडीने कार्यवाही करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे निर्देश, राज्य सरकार ॲक्शन मोडवर

Pune : भटक्या कुत्र्याचा महिलेवर हल्ला; तोल जाताच बाळ पडलं खाली, Video व्हायरल

Mumbai : निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता; राजावाडी रुग्णालयातील अन्य डॉक्टरांवर ताण, दिवसाला ५०० रुग्णांची तपासणी

Madhya Pradesh : भाजप आमदाराने अग्निशमन दलाच्या वाहनाने धुतली स्वतःची कार; VIDEO व्हायरल