संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

महायुतीच्या घटक पक्षांमध्ये किती जागांवर सहमती? भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती

जागावाटप करताना जिंकून येण्याची शाश्वती याच निकषावर घटक पक्षांमध्ये जागांचे वाटप केले जाईल, असे संकेतही बावनकुळे यांनी दिले आहेत.

Swapnil S

नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपांसदर्भात एकुण २८८ जागांपैकी ७० ते ८० टक्के जागांवर महायुतीच्या घटक पक्षांमध्ये सहमती झाली आहे, अशी माहिती भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. जागावाटप करताना जिंकून येण्याची शाश्वती याच निकषावर घटक पक्षांमध्ये जागांचे वाटप केले जाईल, असे संकेतही बावनकुळे यांनी दिले आहेत.

अजित पवार यांच्या राष्टवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत ७० ते ८० जागांवर दावा केला असल्याचे बोलले जात आहे. याबरोबरच शिंदे यांच्या शिवसेनेच्या काही जागांवरूनही राष्टवादीन व शिवसेनेत वाद सुरू आहे. या सर्व घडामोडींबाबत पत्रकारांनी विचारले असताना बावनकुळे म्हणाले की, जवळपास ७० ते ८० टक्के जागांवर भाजप-शिवसेना आणि राष्टवादी या तिनही पक्षांमध्ये सहमती झालेली आहे. उर्वरित जागांवरही लवकरच निर्णय घेण्यात येईल.

केवळ जागांचे आकडे न मिरवता विधानसभा निवडणुका एकत्रितपणे जिंकण्यासाठी वचनबद्ध असल्याबद्दल महायुतीची तीनही नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तीनही नेत्यांचे खरेतर अभिनंदन केले पाहिजे़, असेही बावनकुळे म्हणाले.

महायुतीत भाजप हा सर्वांत मोठा पक्ष आहे़ लोकसभा निवडणुकीत झालेली पिछेहाट पाहता राज्यातली सत्ता कोणत्याही परिस्थितीत टिकवण्यासाठी भाजप पुरेपूर काळजी घेत आहे. पक्षाचे राष्टीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी मुंबई दौऱ्यात स्थानिक नेत्यांशी जागावाटपाबाबत चर्चा केली होती़ त्यावेळी, महायुती सरकारमध्ये भाजप मोठ्या भावाप्रमाणे असून युतीतील दोन्ही घटक पक्षांना सांभाळून घेतले पाहिजे, अशी सूचना नड्डा यांनी नेत्यांना केली होती.

UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; घणसोली-शीळफाटा दरम्यान पाच किमीचा बोगदा पूर्ण

Kalyan-Dombivli : रहिवाशांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई - शिंदे

संघर्षाची सुरुवात व शेवट कसा करायचा हे भारताकडून शिकावे! हवाई दलप्रमुख ए.पी. सिंग यांचे प्रतिपादन

आत्मनिर्भर भारतच देशाची शक्ती - मोदी