महाराष्ट्र

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : उच्चाधिकार समितीची पुनर्रचना

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भातील धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाने उच्चाधिकार समितीची नव्याने पुनर्रचना केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचाही समितीत समावेश करण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भातील धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाने उच्चाधिकार समितीची नव्याने पुनर्रचना केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचाही समितीत समावेश करण्यात आला आहे. नव्या सरकारच्या स्थापनेनंतर उच्चाधिकार समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्यासाठी समिती कार्यरत असणार आहे. या समितीच्या माध्यमातून सीमावादातील न्यायालयीन लढाई, कन्नड भाषिक राज्यातील मराठी भाषिकांचे हक्क व सुरक्षा यासारख्या मुद्द्यांवर सुसंगत आणि सशक्त धोरण राबवले जाणार आहे.

पुनर्रचित उच्चाधिकार समितीमधील सदस्य

  • देवेंद्र फडणवीस – मुख्यमंत्री, अध्यक्ष

  • एकनाथ शिंदे – उपमुख्यमंत्री

  • अजित पवार – उपमुख्यमंत्री

  • शरद पवार – राज्यसभा सदस्य

  • नारायण राणे – लोकसभा सदस्य

  • पृथ्वीराज चव्हाण – माजी मुख्यमंत्री

  • चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व समिती समन्वयक

  • शंभूराज देसाई – पर्यटन मंत्री व समिती समन्वयक

  • प्रकाश आबिटकर, जयंत पाटील, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, सचिन

  • शेट्टी, रोहित पाटील – विधानसभा सदस्य

  • राजेश क्षीरसागर – कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

  • विरोधी पक्षनेते – विधानसभा आणि विधानपरिषद

  • प्रकाश आवाडे – विधानसभा सदस्य

महापौरपदांसाठी आज सोडत; मुंबईच्या सोडतीकडे सर्वांचे विशेष लक्ष

शिवसेना पक्ष, चिन्हाचा निर्णय पुन्हा लांबणीवर; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख

ठाकरे सेनेच्या गटनेतेपदी किशोरी पेडणेकर

आजचे राशिभविष्य, २२ जानेवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

माघी गणेश जयंती निमित्त खास मराठी शुभेच्छा संदेश; WhatsApp, Facebook, Instagram द्वारे शेअर करा आकर्षक कार्ड्स