संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

पुढील चार दिवस ‘वरुण’धारा; मान्सूनची राज्यात वेगाने आगेकूच, अनेक जिल्ह्यांना इशारा

कोकणात दाखल झालेल्या पावसाची विजेच्या गडगडाटासह जोरदार बॅटिंग, मुंबईकरांसह राज्यातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन...

Swapnil S

मुंबई : उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांवर पावसाची लवकरच कृपादृष्टी होणार आहे. कोकणात दाखल झालेल्या मान्सूनचा जोर वाढला असून राज्यात वेगाने मान्सूनची आगेकूच सुरू आहे. मुंबईत रविवारपासून पुढील चार दिवस विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस बरसणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्गात सध्या मुसळधार पाऊस पडत असून, मुंबईत चार दिवस ‘यलो अलर्ट’ तर सिंधुदुर्गात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांसह राज्यातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कुलाबा हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी केले आहे. उर्वरित कोकण, मराठवाड्याला पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. उत्तर कोकण, दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.

राज्यात अनेक जिल्ह्यांना इशारा

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड पट्ट्यात रविवारपासून मान्सूनचा विस्तार होण्याचा अंदाज ‘आयएमडी’ने वर्तवला आहे. याशिवाय, जळगाव, धुळे, कोल्हापूर, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या जिल्ह्यांत पुढील ४८ तासांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे आणि नगर या भागात काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

गेले तीन महिने उष्णतेच्या लाटांमुळे लोकांचा घामटा निघाला. पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना व मुंबईकरांना दोन दिवसांपूर्वी मान्सून कोकणात डेरेदाखल झाल्याने दिलासा मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वी कोकणात दाखल झालेल्या पावसाची विजेच्या गडगडाटासह सध्या जोरदार बॅटिंग सुरू आहे. कोकणात पावसाची दमदार हजेरी सुरू असून, पुढील काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत