महाराष्ट्र

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

Swapnil S

मुंबई : राज्यात नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना पावसाचा माराही जोरात सुरू आहे. गुरुवारी मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याणसह राज्याच्या विविध भागात पावसाने धुमशान घातले. आता शनिवारी दसऱ्याला मुंबईत जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

राज्यात पूर्वेकडून येणारा वारा सुरू झाल्याने मान्सून पुन्हा परतण्याची शक्यता आहे. राज्यात किमान व कमाल तापमानात वाढ होत आहे. त्यातच आर्द्रता वाढीस लागल्याने पावसाची दाट शक्यता आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्याच्या विविध भागांत पावसाची शक्यता आहे.

राज्याच्या काही भागात यलो अलर्ट

महाराष्ट्रातील काही भाग व मराठवाड्याच्या काही भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडू शकतो.

१६ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार

भारतीय हवामान खात्यानं १२ ते १६ ऑक्टोबर दरम्यान काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. IMD नुसार या कालावधीत, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान खात्याने, उद्या १३ ऑक्टोबर रोजी केरळ आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसासह कोकण आणि गोवा, गुजरात, अंदमान आणि निकोबार बेटांवर अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे.

दसरा मेळाव्यांचं काय?

मुंबईत आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने ठाकरे गटाच्या आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावरही पावसाचं सावट आहे.

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त

नवी मुंबई विमानतळावर लढाऊ विमानाचे यशस्वी लँडिग; एअरपोर्ट कधी होणार सुरू?