महाराष्ट्र

नाशिक शिंदेंकडेच! हेमंत गोडसे यांना मिळाली उमेदवारी

Aprna Gotpagar

मुंबई : कामगार दिनाचे औचित्य साधत महायुतीने उमेदवारी जाहीर करण्याचा धडाका लावला आहे. महायुतीने आज (१ मे) ठाणे आणि कल्याण मतदारसंघाच्या उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर महिनाभरापासून चर्चेत असलेल्या नाशिक मतदारसंघातून महायुतीने शिंदे गटाचे शिलेदार आणि विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली आहे.

शिंदे गटाच्या अधिकृत अकाउंटवरून हेमंत गोडसे यांना नाशिकमधून उमेदवारी दिल्याचे जाहीर केले. नाशिक मतदारसंघासाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाने दावा केला होता. त्यामुळे नाशिकचा उमेदवार ठरत नव्हता. नाशिकसाठी सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ हे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक होते. परंतु, उमेदवारी जाहीर करण्यास होत असलेल्या विलंबामुळे भुजबळांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. यानंतर आज हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळाली. आता नाशिकमध्ये हेमंत गोडसे विरूद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे या दोघांमध्ये लढत होणार आहे. नाशिकच्या उमेदवारांची घोषणा ही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन दिवस शिल्लक असताना केली आहे. हेमंत गोडसे यांना प्रचार करण्यासाठी कमी दिवस राहिले आहे. यात गोडसे यांना नाशिक पिंजून काढायचे आहे.

हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर भुजबळ म्हणाले, नाशिक मतदारसंघाला हेमंत गोडसे यांचा परिचय आहे. गेल्या दहा वर्षापासून हेमंत गोडसे हे खासदार राहिले असून त्यांनी बरीच कामे केली आहेत. या १५ ते १६ दिवसात हेमंत गोडसेंचा प्रचार आम्ही ताकतीने करू, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली आहे.

हेमंत गोडसे उद्या उमेदवारी अर्ज भरणार

नाशिकमध्ये पाचव्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. हेमंत गोडसे हे उद्या (२ मे) नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत. नाशिमध्ये १४८ उमेदवारांनी अर्ज भरला आहे. परंतु, अर्ज नेहण्यांच्या तुलनेत दाखल करणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. ३ मे ही नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

ठाणे आणि कल्याणची उमेदवारी जाहीर

महायुतीने शिंदे गटाकडून माजी महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणे मतदरासंघातून उमेदवारी दिली आहे. तर, कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त