महाराष्ट्र

सदावर्तेंविरोधात धाराशिवमधील मराठा समाज आक्रमक ; निवेदन देत केली गुन्हा दाखल करण्याची मागणी

जरांगे पाटील यांची सभा हे केवळ एका यात्रेच स्वरुप आहे. यात्रेला लोक येतात आणि मजा करुन जातात, असं वक्तव्य गुणरत्न सदावर्ते यांनी केलं होतं.

नवशक्ती Web Desk

शनिवारी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सभा पार पडली. या सभेतून जरांगे यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका केली होती. यानंतर सदावर्ते यांनी जरांगेंच्या सभेचा उल्लेख सभा नसून जत्रा असा केला होता. यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून सदावर्तेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

जानल्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वा शनिवारी सभा झाली. याच सभेतून त्यांनी काही राजकीय नेत्यांवर टीका केली होती. सोबतच गुणरत्न सदावर्तेंवर देखील टीकेचे बाण सोडले होते. यानंतर जरांगेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना "जरांगे पाटील यांची सभा हे केवळ एका यात्रेच स्वरुप आहे. यात्रेला लोक येतात आणि मजा करुन जातात", असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं होतं. या टीकेवरुन आक्रमक झालेल्या मराठा समाजाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

धाराशिवच्या कळंब येथील मराठा समजाच्या वतिने देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, "जरांगे यांच्या सभेसाठी मराठा समाज एकवटला व आपल्या एकजुटीतून मराठा समाजाच्या वेदना दिसून आल्या. या सभेतील गर्दी ही कुठल्याही कॅमेऱ्यात व छायाचित्रातही न मावनारी होती. परंतु, गुणरत्न सदावर्ते या व्यक्तीने या सभेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यांनी ही सभा नसून जत्रा आहे. असं वक्तव्य केल्याने मराठा समाजात संतापाची लाठ पसरली असून सदावर्तेंवर तातडीने गुन्हा नोंद करा", अशी मागणी कळंब सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या निवेदानात केली आहे.

कळंब तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने सदार्ते यांच्या वक्तव्याच्यया विरोधात तालुक्यातील पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आलं.तसंच तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्रात हिंसक वातावरण निर्माण करणाऱ्या सदावर्तेंवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला.

सदावर्ते नेमकं काय वक्तव्य केलं?

मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेला प्रत्युतर देताना सदावर्ते यांनी जरांगे यांची सभा हे केवळ यात्रेचं स्वरुप असल्याचं म्हटलं. लोक येतात आणि मजा करुन जातात. मला सायलेंट करण्यासाठी बोललं जातं. पण मी सायलेंट होणार नाही. जरांगेचे पॉलिटीकल बॉसेस वेगळे आहेत. जरांगेनी त्यांच्या पॉलिटीकल बॉसेसला दाखवून दिलंय की ते किती लॉयल आहेत, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटल्याने मराठा समजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी