महाराष्ट्र

'हिंदू मुलींकडे बघाल तर डोळे...' भाजपच्या या नेत्याने दिला थेट इशारा

प्रतिनिधी

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी लव्ह जिहाद विरोधात पाटणमध्ये महामोर्चा काढला. यावेळी त्यांनी लव्ह जिहाद कायद्याविषयीही मागणी केली. ते म्हणाले की, 'हिंदू मुलींकडे बघाल तर डोळे काढून म्युझियममध्ये ठेवेन' असा थेट इशारा त्यांनी दिला. 'आपल्याकडे हिंदूंची संख्या जास्त आहे. तरीही मूठभर जिहादी आपल्याला भारी पडत असतील तर आपली छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर नतमस्तक होण्याची कुवत आहे का? असा सवाल त्यांनी हिंदू बांधवाना केला आहे.

आमदार नितेश राणे म्हणाले की, "गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या समाजातील मुलींवर अन्याय, अत्याचार होत आहेत. तरीही त्याबद्दल कोणतीही कारवाई का केली जात नाही. हिंदू धर्माने आता जागे झाले पाहिजे." एवढंच नव्हे तर त्यांनी यावेळी इतर राज्यांप्रमाणे लव्ह जिहादचा कायदा करण्याची मागणी केली. तर त्यांनी थेट डोळे काढून तेच डोळे म्युझियमध्ये ठेवण्याची भाषा केल्याने आता यावर वाद निर्माण होतो का? असा प्रश्न विचारला जात आहे. यावरून बोलताना विरोधीपक्षनेते अजित पवार म्हणाले की, "कोणाच्याही मागणीवरून कायदा बनत नसतो" असा टोला लगावला.

"मोदी...तेवढी तुमची लायकी नाही..." नाशिकच्या सभेतून उद्धव ठाकरेंचं पंतप्रधानांवर टीकास्त्र

पंतप्रधान मोदींचं उद्धव ठाकरे अन् शरद पवारांना ओपन चॅलेंज, पाहा काय म्हणाले?

"हे व्होट जिहाद करतात..."नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबईत रोड शो; महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन, कल्याणमध्ये जाहीर सभा

"मी हिंदू-मुस्लिम करणार नाही, हा माझा संकल्प..." पंतप्रधान मोदींचं वक्तव्य