महाराष्ट्र

Rahul Gandhi on Veer Savarkar: मनसे विरुद्ध राहुल गांधी ; मनसेच्या बड्या नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

प्रतिनिधी

काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo) ही सध्या महाराष्ट्रामध्ये सुरु आहे. अशामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मनसे (MNS) आज आक्रमक झाली आहे. त्यांनी शेगावमधील सभा उधळण्याचा इशारा काँग्रेस आणि राहुल गांधींना (Rahul Gandhi) दिला होता. राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रभरातून मनसैनिक शेगावच्या दिशेने रवाना झाले. तर, मनसेचे नेते संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, दिलीप बापू धोत्रे यांच्यासह काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यानंतर, 'वारंवार सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवणार असल्याचे मनसेने म्हटले आहे. दरम्यान मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी चिखली नाक्यावर रोखलं आहे. यानंतर त्या ठिकाणीच मनसे नेते आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं. राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजीही सुरू झाली. यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सध्या मनसेसोबतच भाजपही राहुल गांधींविरोधात महाराष्ट्रभर घोषणाबाजी करत आहेत.

भर सभेत रडले रोहित पवार...सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेत नेमकं काय घडलं?

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जमावानं जीव जाईपर्यंत मारलं, नेमका कुठं घडला प्रकार?

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम

थांबा... पुढे धोका, आज समुद्र खवळणार; हवामान विभागाचा 'अलर्ट'; समुद्रात जाणे टाळा, पालिकेचे आवाहन

भारतीय नौदल बांधणार ‘एआयपी’ तंत्रज्ञानाने पाणबुड्या; ६० हजार कोटींचा प्रकल्प!