प्रातिनिधिक फोटो
महाराष्ट्र

Maharashtra SSC 10th Results 2024 Updates: यंदा दहावीचा निकाल ९५.८१ टक्के

Tejashree Gaikwad

MSBSHSE Maharashtra Board Class 10th SSC Result 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) २७ मे रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेत परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका दुपारी १ वाजेपासून mahahsscboard.in किंवा mahresult.nic.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

दहावीच्या निकालाची गेल्या वर्षीची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९३. ८३ टक्के नोंदवली गेली होती, २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा टक्का ३.१८ ने घसरला होता. यंदा मात्र दहावीच्या निकालात गतवर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे.

जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट

  • यंदाही दहावीच्या निकालात मुलींची बाजी

  • कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९९.०१ टक्के

  • नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी ९४.७३ टक्के

  • राज्यातील ९३८२ शाळांचा निकाल १०० टक्के

  • ७२ विषयांपैकी १८ विषयांचा निकाल १०० टक्के

  • २६ हजार ६४५ विद्यार्थ्यांना एटीकेटीचा लाभ

  • राज्यातील नऊ विभागांमधून तब्बल १८७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

  • सर्वाधीक १०० टक्के प्राप्त केलेले विद्यार्थी लातूरमधील

  • लातूर विभागात १२३ विद्यार्थ्यांना १०० टक्के

  • मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९७.२१ तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५६

  • दहावीचा निकाल वेबसाईटसह डिजीलॉकर अॅपमध्ये देखील पाहता येणार

  • यंदा १६ लाख २१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यामधील १५ लाख १७ हजार ८०२ विद्यार्थी उत्तीर्ण

  • महाराष्ट्र एसएससी विभागनिहाय निकाल

    - पुणे: ९६.४४%

    - नागपूर: ९४.७३%

    - संभाजीनगर : ९५.१९%

    - मुंबई: ९५.८३%

    - कोल्हापूर : ९७.४५%

    - अमरावती: ९५.५८%

    - नाशिक : ९५.२८%

    - लातूर: ९५.२७%

    - कोकण: ९९.०१%

  • यावर्षी ९३८२ शाळांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या शाळांमधील सर्व विद्यार्थी एसएससी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत एकूण २३,२८८ शाळांनी सहभाग घेतला होता. मात्र, इथे नमूद करण्यासारखी आणखी एक बाब म्हणजे, राज्य मंडळाच्या १०,००० शाळांनी मागील वर्षी हे यश संपादन केल्याने १०० टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या घटली आहे.

उमेदवार त्यांचे निकाल खाली दिलेल्या कोणत्याही वेबसाइटवर पाहू शकतात.

> https://mahresult.nic.in

> http://sscresult.mkcl.org

> https://sscresult.mahahsscboard.in

> https://results.digilocker.gov.in

> https://results.targetpublications.org

'असा' बघा निकाल

> वरती दिलेली कोणतीही वेबसाइट उघडा.

> होम पेजवर, SSC निकाल या टेक्स्ट लिंकवर क्लिक करा.

> लॉगिनसाठी आवश्यक माहिती टाका.

> पुढे जाण्यासाठी 'सबमिट करा' वर क्लिक करा.

> तुमचा निकाल आता तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

> या मार्कशीटची प्रत तुम्ही तिथून डाउनलोड करू शकाल.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त