महाराष्ट्र

वाघनखांवरुन नाना पाटेकरांनी मुनगंटीवारांना डिवचलं ; म्हणाले...

छत्रपती शिवाजी महाराज यांची लंडनमध्ये असणारी वाघनखं लवकरच भारतात आणली जाणार आहेत.

नवशक्ती Web Desk

अवघा महाराष्ट्र ज्या एका नावाखाली एकत्र येतो ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज(Chhatrapati Shivaji Maharaj). या एका नावाभोवती संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण फिरत असतं. आता छत्रपती शिवाजी महाराज यांची लंडनमध्ये असणारी वाघनखं लवकरच भारतात आणली जाणार आहेत. ही नख भारतात आणायला स्वत: राज्याचे सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार(Sudhir MUngantiwar) हे जाणार आहेत. यावरून अभिनेते नाना पाटेकर(Nana Patekar) यांनी मात्र मुनगंटीवार यांना चांगलीच कोपरखळी मारली.

काय म्हणाले नाना पाटेकर

नाना पाटेकर यांनी वाघनखांच्या मुद्यावरुन एक पोस्ट शेअर करत सुधीर मुनगंटीवार यांना डिवचलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "मुनगंटीवार महाराजांची वाघनखं आणत आहेत, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन.. जमलं तर त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा बाहेर काढता आला तर पाहा."

नाना पाटेकर यांनी केलेल्या या पोस्टवर अक्षरश: प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. अनेकांनी ती शेअर देखील केली आहे. कोथळा काढलाय पण तुम्हाला डोळ्यांवरील पट्टीमुळे दिसत नाही, भ्रष्टाचाराचा कोथळा काढायचा म्हणजे स्वत:च्या सरकारवर वार केल्यासारख होईल, महाराजांच्या वाघनखांनी भ्रष्टाचारा कोथळा काढणार नाहीत, उलट विरोधी व सत्ताधारी हे दोघेही भ्रष्टाचाराचा विरोध करतील आणि त्याचाच आर्थिक कोथळा काढतील, अशा अनेक प्रतिक्रिया या पोस्टवर उमटताना दिसत आहेत.

काय आहे प्रकरण?

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा काढण्यासाठी जी वाघनखं वापरली होती. ती वाघनखं सध्या ब्रिटनमध्ये आहेत. आता ब्रिटनने ती वाघनखं भारताला परत देण्यास मान्यता दिली असून महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार ही वाघनखं घ्यायला ऑक्टोंबरमध्ये इंग्लंडला रवाना होणार आहेत. मुनगंटीवार यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना याबाबतची माहिती दिली आहे. इंग्लंडसोबत महारांजी वाखनखं परत आणण्यासाठी सामंजस्य करार करणार असल्याचं ते म्हणाले.

सध्या ही वाघनखं लंडनमधील 'विक्टोरिया अॅन्ड अल्बर्ट वस्तुसंग्रहाल'यात ठेवण्यात आली आहेत. पण आता डिसेंबरपर्यंत ही वाघनखं महाराष्ट्रात आणली जातील असं म्हटलं जात आहे. ही वाघनखं मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मुख्यमंत्रीपदाचा फैसला आज; महायुतीचे नेते व केंद्रीय संसदीय मंडळ घेणार निर्णय

महायुतीत मंत्रिपदासाठी २१-१२-१० चा फॉर्म्युला

आजपासून सुरू होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; अदानी, मणिपूरवर चर्चा करा! सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांची मागणी

यशस्वी, विराटचा शतकी तडाखा; भारताचा दुसरा डाव ४८७ धावांवर घोषित; ऑस्ट्रेलियाची ३ बाद १२ अशी अवस्था

यूपीतील हिंसाचारात तिघांचा मृत्यू; २० पोलिसांसह अनेक जण जखमी